MLA Jitendra Awhad | हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याची पोलिसांत तक्रार, जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात पहिला गुन्हा पुण्यात दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी (Controversial Statement) त्यांच्यावर पहिला गुन्हा (FIR) पुण्यात दाखल करण्यात आला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांच्यावर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) गुन्हा दाखल केला आहे.

पुणे शहर भाजपचे शहराध्यक्ष (Pune City BJP City President) धीरज घाटे (Dheeraj Ghate) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरुद्ध तक्रार दिली आहे. जितेंद्र आव्हाड (MLA Jitendra Awhad) यांनी प्रभू श्रीरामांबद्दल (Lord Shri Ram) केलेल्या वादग्रस्त विधानावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर आयपीसी 295 (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाच्या (NCP Sharad Pawar Group) शिर्डी येथील राज्यस्तरीय शिबीरात बोलताना प्रभू रामचंद्राबद्दल वादग्रस्त विधान केले होते. प्रभू श्रीरामचंद्र हे 14 वर्षे वनवास भोगत असताना मांसाहार करत होते. तसेच प्रभू श्रीरामचंद्र हे बहुजनांचा राम शिकार करुन खाणारा राम, राम हा शाकाहारी नव्हता, मांसाहारी होता, असे वादग्रस्त विधान करुन समाजात तणाव निर्माण करणारे प्रक्षोभक वक्तव्य आव्हाड यांनी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी केलेले प्रक्षोभक वक्तव्य हे त्यांच्या पक्षाच्या अधिकृत व्यासपीठावरुन केले आहे.
येत्या 22 जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिराच्या (Sri Ram Temple Ayodhya) प्राणप्रतिष्ठापनेच्या
पार्श्वभूमीवर देशाचा धार्मिक सलोखा, अखंडता बाधित करण्याकरिता त्यांनी हिंदू धर्मियांचे श्रद्धास्थान असणाऱ्या
प्रभू श्रीरामांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करुन जनतेच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असेही तक्रारीमध्ये म्हटले आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Asha Workers Strike | राज्यव्यापी बेमुदत संप! राज्य सरकारने आश्वासन न पाळल्याने आशा स्वयंसेविका आक्रमक

Pune Pimpri Chinchwad Crime News | पीडब्ल्युडीमध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 5 लाखांची फसवणूक, एकाला अटक; तळेगाव मधील प्रकार