ठाण्याचे पाणी पेटल्यास शिवसेना जबाबदार : जितेंद्र आव्हाड

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन – सध्या महाराष्ट्रावर पाण्याचे मोठे संकट आहे. राज्यातील काही भाग दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळाची झळ केवळ ग्रामीण भागालाच नाही तर शहरी भागात सुद्धा आहे. दरम्यान पाण्याच्या समस्येला कंटाळून ठाण्यातील कळवा, विटावा आणि खारेगाव येथील नागरिकांनी आज (४)सकाळी कळवा प्रभाग समिती कार्यालयावर खारेगाव नका येथून जण आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी ठाण्याच्या पाणीप्रश्नाला शिवसेनाच जबाबदार असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला.


शिवसेनेचे शाखाप्रमुख पाण्याची चोरी करतात

यावेळी बोलताना ते म्हणाले, खरतर उद्धव ठाकरे यांनी स्वात: पाण्याच्या प्रश्नावर तोडगा काढावा, अन्यथा ठाणे पेटले तर याला जबाबदार सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार असेल. पाण्याच्या धरणाकरिता सर्व पक्षांनी एकत्र येऊन पालकमंत्री यांनी एक बैठक लावून धरण बांधण्याकरिता लक्ष दिले पाहिजे, परंतु येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख पाण्याची चोरी करत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला. पाण्याच्या धरणाकरिता सर्व पक्षांनी एकत्र येऊन पालकमंत्री यांनी एक बैठक लावून धरण बांधण्याकरिता लक्ष दिले पाहिजे, परंतु येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख पाण्याची चोरी करत असल्याचा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केला.

दरम्यान, यावेळी मोर्चात मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रवादीचे कळवा परिसारतील सर्व नगरसेवक सहभागी झाले होते.