एमआयडीसीतील विजेच्या प्रश्नावर आमदार लांडगे यांनी घेतली महावितरण अधिकाऱ्यांची बैठक

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन
शहरातील औद्योगिक परिसरात सातत्याने वीज पुरवठा खंडित होत आहे. दररोज चार पाच तास वीज गायब होते. त्यामुळे सध्याच्या मंदीच्या काळात उद्योजकांना लाखो रुपयांचे नुकसान सहन करावे लागत आहे. महावितरणच्या अधिका-यांनी तातडीने हा प्रश्न मार्गी लावावा आणि निर्धारित वेळेत कामे पूर्ण करण्याच्या कडक सूचना आमदार महेश लांडगे यांनी महावितरणच्या अधिका-यांना दिल्या आहेत.
[amazon_link asins=’B07418TNB1′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’20e838a2-a54b-11e8-80df-472492625831′]

औद्योगिक परिसरातील विद्युत पुरवठ्याच्या समस्येबाबत आमदार महेश लांडगे यांनी महावितरणचे अधिकारी, लघु उद्योग संघटनेचे पदाधिकारी यांची संयुक्त बैठक घेतली. त्यावेळी खंडीत विजेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश देण्यात आले. या बैठकीला पिंपरी-चिंचवड लघु उद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, सचिव जयंत कड, माजी अध्यक्ष सुरेश म्हेत्रे, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता तालेवार, अधीक्षक अभियंता तगलपलवार, प्रभारी कार्यकारी अभियंता बारणे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक परिसरातील ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ जुने झाले असून जुन्या ‘ओव्हरवेड’ वायर तुटून, कमी क्षमतेच्या ‘ट्रान्सफार्मर’वर जादा भार दिल्यामुळे वीजपुरवठा खंडीत होत आहे. ट्रान्सफार्मर ओव्हरलोड झाले आहेत. त्यामुळे जादा क्षमतेचे ट्रान्सफार्मर बसविण्यात यावेत. ओव्हरहेड वायर लोंबकळत असल्यामुळे उंचीच्या मालवाहतूक करणा-या वाहनांना त्या खालून जाता येत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता असून सर्व ठिकाणी ओव्हरहेड वायर काढून भूमिगत केबल टाकून वीजपुरवठा करावा.
[amazon_link asins=’B019MQLUZG’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’2983bdff-a54b-11e8-b959-f5ca1c0a32f9′]

कुदळवाडी चिखली परिसर मोई चाकण फीडरला जोडल्यामुळे या परिसरातील हजारो उद्योगांना चार ते आठ तास सक्तीचे भारनियमन सहन करावे लागते. त्यामुळे कुदळवाडी, चिखली परिसर टेल्को फीडरला तातडीने जोडण्यात यावा, अशी सूचना आमदार लांडगे यांनी दिली आहे. तसेच उद्योजकांना वीज मीटर उपलब्ध करुन देण्यात यावेत. तळवडे औद्योगिक परिसरातील वारंवार होणा-या खंडीत होणारा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी येथील देवी इंद्रायणी सब स्टेशन पूर्ण क्षमतेने सुरु करावे. नवीन वीज पुरवठा मागणी मंजूरी पद्धत ट्रान्सफॉर्मरचे एम.डीय फॅक्टर यापूर्वीच्या पद्धतीने सुरु ठेवण्यात यावा. महावितरणने वीज नियामक आयोगाकडे मागितलेली वीज दरवाढ रद्द करावी.

डी.पी. फिडर बॉक्सची झाकणे चोरीला गेल्यामुळे फिडर उघडले पडले आहेत. त्यामुळे गंभीर अपघात होऊ शकतो. सर्व डी.पी. फिडर बॉक्सला झाकणे बसविण्यात यावीत. जुने झालेले सर्व डी.पी. बॉक्स व फिडर नवीन लावण्यात यावेत. महावितरणच्या कर्मचा-यांना वेळेवर केबलचे साहित्य देण्यात यावे, असे आमदार लांडगे यांनी सांगितले.