MLA Madhuri Misal | सिंहगड रस्त्याला पर्यायी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करा – आमदार माधुरी मिसाळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Madhuri Misal | सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) वाहतुकीला पर्यायी रस्ता ठरणार्‍या कॅनालच्या कडेने पर्यायी मार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना आमदार माधुरी मिसाळ (MLA Madhuri Misal) यांनी केल्या.

 

आमदार मिसाळ आणि महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (pmc additional commissioner kunal Khemnar) यांनी आज या मार्गावर सुरू असलेल्या विकासकामांची पाहाणी केली. नगरसेविका मंजुषा नागपुरे, अनिता कदम, पथ विभाग प्रमुख विजय कुलकर्णी, खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, सहायक अभियंता सुभाष शिंदे, अमर शिंदे, व्ही. एस. इंगवले उपस्थित होते.

मिसाळ (MLA Madhuri Misal) म्हणाल्या, सिंहगड रस्त्यावरील राजाराम पुल ते फनटाइम थिएटर (rajaram bridge to fun time multiplex)
दरम्यानच्या प्रस्तावित उड्डाण पुलाचे काम लवकरच सुरू होत आहे.
त्यापूर्वी पर्यायी रस्त्याची सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. मिसाळ पुढे म्हणाल्या,
वडगांव बुद्रक ते पु. ल. देशपांडे उद्यान दरम्यान साडेचार किलोमीटर लांबीचा आणि साडेसात मीटर रुंदीचा मार्ग विकसित करण्यात येत आहे.
त्यापैकी तीन किलोमीटर नऊशे मीटर रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे.
देशपांडे उद्यानामागील बेबी कॅनालवरील सहाशे मीटर लांबीच्या रस्त्याचे काम बाकी आहे.
ते तातडीने हाती घेण्यात येत आहे. पर्यायी रस्त्याच्या बाजूने सीमाभिंत बांधणे,
विद्युत वाहिन्या भूमिगत करणे, ट्रान्सफॉर्मर हलविणे, झाडांचे स्थलांतरण करणे, कलवडची दुरुस्ती आदी कामे करण्याच्या सूचना दिल्या.

 

Web Title :- MLA Madhuri Misal | Complete the work of alternative route to Sinhagad road immediately – MLA Madhuri Misal

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Smart City Company-ATMS | कॉंग्रेस, NCP चे काही नगरसेवक नेहमीप्रमाणे केवळ ‘ठेकेदार’ डोळ्यासमोर ठेवून आरोप करताहेत; सभागृहनेते गणेश बिडकर यांचा ‘घणाघात’ (व्हिडीओ)

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Isha Ambani | ईशा अंबानी यांची ‘स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट’च्या बोर्डावर नियुक्ती

Pune Crime | अनधिकृत बांधलेल्या फ्लॅटची विक्रीकरुन 47 लाखांची फसवणूक, कोंढवा पोलिसांकडून मजहर शेखला अटक

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक