Pune Crime | अनधिकृत बांधलेल्या फ्लॅटची विक्रीकरुन 47 लाखांची फसवणूक, कोंढवा पोलिसांकडून मजहर शेखला अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  Pune Crime | अनधिकृतपणे बांधलेल्या फ्लॅटची विक्री करुन 47 लाख रुपयांची फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार पुण्यात (Pune Crime) उघडकीस आला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी (Kondhwa police) मजहर नजीर शेख Mazhar Nazir Sheikh (वय-48 रा. हिल टॉप सोसायटी, पारगेनगर, कोंढवा खु) याला अटक (Arrest) केली आहे. हा प्रकार ऑक्टोबर 2016 ते 27 ऑक्टोबर 2021 या कालावधीत घडला आहे.

 

फिरोज मोहंमदइसा शेख Feroz Mohammadisa Sheikh (वय-45 रा. ताबूत स्ट्रीट कॅम्प,पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa police station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. फिर्यादी यांना फ्लॅट खरेदी करायचा असल्याचे आरोपी मजहरला सांगितले.
त्यावेळी त्याने कोंढवा बुद्रुक येथे एम.एस. कन्स्ट्रक्शन (M.S. Construction) या बांधकाम व्यावसायाच्या नावाने हिल टॉप सोसायटीची (Hill Top Society) इमारत बांधली असल्याचे सांगितले.
तसेच फिर्यादी यांना तळमजल्यावरील फ्लॅट घेण्यास भाग (Pune Crime) पाडले.

 

फिर्यादी आणि आरोपी यांच्यामध्ये अ‍ॅग्रिमेंट टु सेल (Agreement to sell) करारनामा झाला.
त्यानंतर फिर्यादी यांनी फ्लॅटची ठरलेली 47 लाख रुपये आरोपी मजहर यांना दिली.
सर्व रक्कम दिल्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना रक्कम मिळाल्याबाबतचा करारनामा करुन दिला.
पैसै देऊनही आरोपीने फिर्यादी यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही.
काही दिवसांनी खरेदी केलेला फ्लॅट हा अनधिकृतपणे (Unauthorized) बांधला असल्याची माहिती (Pune Crime) फिर्यादी यांना मिळाली.

फिर्यादी यांनी पैशांची मागणी केली असता आरोपीने पैसे देण्यास टाळाटाळ केली.
तसेच माझ्याकडे पैसे आल्यानंतर देईन असे म्हणत पैसे मागितले तर जीवे मारण्याची धमकी दिली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिरोज शेख यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात मजहर शेख याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली.
पोलिसांनी फिरोज यांच्या फिर्यादीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन खेतमाळस (PSI Sachin Khetmalas) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | Kondhwa police arrest Mazhar Nazir Sheikh for fraud of Rs 47 lakh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Crime Branch Police | बांधकाम व्यावसायिकांना माहिती अधिकार कायद्याची भीती दाखवत 50 लाखांची खंडणी मागणाऱ्या अ‍ॅड. राजेश बजाज, बापू शिंदेला गुन्हे शाखेकडून अटक

BJP | भाजपला मोठा झटका ! राज्यात BJP मधून आऊटगोइंग सुरू

Anti Corruption Bureau Mumbai | 15 हजारीची लाच मागणारे अंमली पदार्थ विरोधी पथकातील 2 पोलीस अँन्टी करप्शनच्या जाळ्यात