Maharashtra Politics News | ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणे बाकी, शिवसेनेचा उद्धव ठाकरेंना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Maharashtra Politics News | राष्ट्रवादी (NCP) आणि ठाकरे गट (Thackeray Group) एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आम्ही केलेला उठाव हा स्वाभिमानासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारासाठी होता. जे संजय राऊत (Sanjay Raut) बोलतात, तेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) बोलतात. अजित पवार (Ajit Pawar) प्रॅक्टिकल बोलत असतात. ज्याला जिकडे जायचे तिकडे जाऊ द्या असे पवार म्हणाले. (Maharashtra Politics News) त्यामुळे आता ठाकरे गट फक्त राष्ट्रवादीत विलीन होणं बाकी आहे, अशा शब्दात शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला.

 

शंभूराज देसाई म्हणाले, युवराजांना निवडून आणण्यासाठी ठाकरेंना दोन विधान परिषदेची आमदारकी (Legislative Council MLA) द्यावी लागली. एक सचिन अहिर (Sachin Ahir) आणि दुसरी सुनील शिंदे (Sunil Shinde) यांना. एका आमदाराला निवडून आणण्यासाठी दोन आमदारकी द्यावी लागली ही महारष्ट्रातील (Maharashtra Politics News) पहिलीच घटना आहे. केवळ युवराजांच्या प्रेमापोटी आहे. त्यामुळे आता कोण मोठा हे त्यांच्यात लागले. हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले.

 

स्टंटबाजी करणं ही नेहमीची पद्धत

विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते बाबत विधिमंडळ सचिवालय निर्णय घेईल. अंबादास दानवे (Ambadas Danve) हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी माजी राज्यपालांना पत्र देऊन उपयोग नाही. नवीन राज्यपाल राज्यात आलेत. त्यामुळे केवळ स्टंटबाजी करणे ही नेहमीची पद्धत आहे. नेत्यांपर्यंत आपण काहीतरी करतोय हे दाखवण्याचा दानवेंचा केविळवाणा प्रयत्न आहे, असा टोला देसाई यांनी लगावला.

 

जाहिरातीवर पडदा पडला

सर्व्हे वेगवेगळ्या संस्थांचे येतात. प्रत्येकाची पद्धती, कॅलक्युलेशन वेगळे असतात. मागच्या जाहिरातीच्या वादावर पडदा पडला आहे.
शिवसेना (Shivsena) -भाजप निवडणुकीत 200 पेक्षा अधिक जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
2024 चा निकाल लगल्यानंतर महाराष्ट्रातला निर्णय एकनाथ शिंदे (Eknath Shinde)
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) घेतील. त्यानंतर दिल्लीतील निर्णयानंतर पुढील गोष्टी होतील.
2024 च्या निवडणुकीत जास्तीत जास्त आमदार-खासदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.

 

 

Web Title :  Maharashtra Politics News | shambhuraj desai criticized uddhav thackeray sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा