MLA Nitesh Rane | संतोष परब यांच्यावरील हल्याचा कट पुण्यात शिजला; नितेश राणेंना पुण्यात आणणार?

सावंतवाडी : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Nitesh Rane | शिवसेना कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) यांच्यावरील हल्ला प्रकरणी आता भाजपचे आमदार नितेश राणे (MLA Nitesh Rane) चांगलेच अडचणीत येताना दिसत आहेत. नितेश राणे यांना काल (बुधवारी) रात्री उशिरा कणकवलीतून सावंतवाडी पोलीस ठाण्यात (Sawantwadi Police Station) आणण्यात आले होते. परंतु गुरूवारी त्यांना पुन्हा तपासासाठी कणकवलीला दाखल करण्यात आले. आता नितेश राणे यांना पुढील तपासासाठी पुण्यात (Pune) नेण्यात येणार आहे. संतोष परब हल्याचा कट पुणे येथेच शिजला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जातोय.

 

नितेश राणे (MLA Nitesh Rane) यांना अटक (Arrested) करण्यात आले आहे. त्यांना न्यायालयाने 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिस अधीक्षकांनी राणे यांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने त्यांना कणकवलीतून सावंतवाडी येथे आणत येथील पोलीस कोठडीत ठेवले होते. तर आता नितेश राणे यांना आज (गुरुवारी) सकाळीच अधिक तपासासाठी पुन्हा कणकवली येथे नेण्यात आले.

 

दरम्यान, तेथे तपास अधिकारी सचिन हुंदळेकर (Sachin Hundalekar) हे राणे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब (Rakesh Parab)
यांची समोरासमोर चौकशी करुन नितेश राणेंना घेऊन सिंधुदुर्ग पोलिस (Sindhudurg Police) अधिक तपासासाठी पुणे (Pune) येथे घेऊन जाऊ शकतात,
असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान याबाबत स्पष्ट माहिती समोर नाही.
तर, परब हल्याचा कट पुण्यात शिजला असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त होतो आहे.

 

 

Web Title :- MLA Nitesh Rane | BJP mla nitesh rane will be taken to pune for investigation in the case of attack on shiv sainik santosh parab

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांची खरमरीत टीका, म्हणाले – ‘पवारसाहेब आम्ही पीत नाही, तुम्हीच वाईन अन् दारूमधला फरक समजावून सांगा’

 

Satara Crime | दुर्दैवी ! बोलेरोची दुचाकीला समोरून धडक, बापलेकाचा मृत्यू

 

IND vs WI | 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा पहिला देश बनणार भारत, वेस्टइंडीज विरूद्ध अहमदाबादमध्ये ऐतिहासिक सामना

 

IND vs WI | 1000 वा एकदिवसीय सामना खेळणारा पहिला देश बनणार भारत, वेस्टइंडीज विरूद्ध अहमदाबादमध्ये ऐतिहासिक सामना