MLA Prasad Lad | ‘कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी तर करण्याचा हेतू नाही ना?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Prasad Lad | मुंबईत दैनंदिन रुग्णवाढ 20 हजारांच्या घरात पोहोचली असली तरी लॉकडाऊनची (Lockdown) सध्या गरज नसल्याचे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल (Mumbai Municipal Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी केले आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर विरोधकांनी चहल आणि पालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला (Shivsena) धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाच्या नावाखाली वेगळी दुकानदारी करण्याचा तर हेतू नाही ना? अशी शंका उपस्थित होत असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी केला आहे.

प्रसाद लाड म्हणाले, इकबाल सिंह चहल यांनी आज केलेलं वक्तव्य म्हणजे प्रशासन (Administration) आणि शासन (Government) यांच्यातील तफावत आज पुन्हा एकदा दिसून आली. महापौर (Mayor) वेगळं सांगतायत आणि आयुक्त वेगळं. कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉनच्या (Omicron) नावाखाली काही वेगळी दुकानदारी चालू करण्याचा तर विचार नाही ना? असा संशय आता सर्वसामान्यांच्या मनात येऊ लागला आहे. आपत्कालीन विभागाची अट घालून सर्व बैठका रद्द करायच्या, हव्या त्या गोष्टी संमत करुन घ्यायच्या आणि जनेतचा पैसा लुटायचा हा आमचा स्पष्ट आरोप असल्याचे आमदार प्रसाद लाड (MLA Prasad Lad) यांनी म्हटले.

खरी परिस्थिती दाखवावी
प्रशासन आणि शासनानं एकदा तरी जनतेसमोर येऊन सत्य बोलावं. खरी परिस्थिती दाखवावी.
कारण आमच्या माहितीप्रमाणे ओमायक्रॉनमुळे जास्त कुणाची हानी होत नाहीय.
औषध व्यवस्थित गेली पाहिजेत, जनतेची सेवा झाली पाहिजे. रुग्णालयांची उपलब्धता व्यवस्थित व्हायला हवी हाच खरा मुद्दा आहे.
सध्या प्रशासन आणि शासनामध्ये जी दुफळी दिसतेय याचा आम्ही निषेध करतो, असेही लाड यांनी म्हटले.

 

 

Web Title :- MLA Prasad Lad | prasad lad replay iqbal singh chahal statment about no need lockdown mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Nagpur Police Recruitment Scam | पोलीस भरतीत मोठा घोटाळा ! भरतीसाठी उमेदवारांकडून 12 ते 15 लाख घेतल्याप्रकरणी तिघे ‘गोत्यात’

 

High Court | बलात्कार पीडितेची एकटीची साक्ष शिक्षेसाठी पुरेसा आधार, HC ने प्रत्यक्षदर्शी नसल्याची बाजू फेटाळली, जाणून घ्या काय म्हटले

 

Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा विळखा वाढला, गेल्या 24 तासात 40 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी