MLA Rohit Pawar | आमदार रोहित पवार अडचणीत! बारामती अ‍ॅग्रोची उच्चस्तरीय चौकशी करा, भाजपा नेते राम शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडे पुन्हा मागणी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MLA Rohit Pawar | यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबरपासून सुरू करण्याचा राज्य सरकारचा (State Government) आदेश असूनही इंदापूर तालुक्यातील शेटफळगडे येथील बारामती अ‍ॅग्रो कारखान्याने (Baramati Agro Factory) गाळप हंगाम सुरू केला. हा सरकारच्या आदेशाचा भंग असल्याने कारखान्याच्या संचालकांवर गुन्हे (FIR) दाखल करण्याची मागणी रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांचे राजकीय विरोधक आणि भाजपा नेते राम शिंदे (BJP Leader Ram Shinde) यांनी केली होती. मात्र, त्यावेळी साखर आयुक्त शेखर गायकवाड (Shekhar Gaikwad) यांनी क्लिन चीट दिली होती. आता पुन्हा एकदा सत्तांतरानंतर राम शिंदे यांनी हिच मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

 

राम शिंदे यांनी पुन्हा जुने प्रकरण उखरून काढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. राम शिंदे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड दीड महिन्यानंतर निवृत्त होत आहेत, त्यांच्यावर ज्यांची मेहरबानी झाली होती त्यांच्याशी प्रमामाणिक राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. पण, त्यांनी शासन निर्णयाच्या विरोधात काम केले आहे.

 

राम शिंदे यांनी म्हटले की, मी माझ्या आरोपांवर ठाम आहे. 10 ऑक्टोबरला बारामती अ‍ॅग्रो साखर कारखाना (Baramati Agro Sugar Factory) सुरू झाला.
त्यानंतर मी साखर आयुक्तांना व्हिडीओ दिले. तसेच आवश्यक ते पुरावे दिले.
त्या कारखान्याची तत्काळ चौकशी करणे अपेक्षित असताना 20 तासांनंतर साखर आयुक्त कार्यालयाचे प्रतिनिधी साखर कारखाना तपासणीसाठी कारखान्यावर गेले.
साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या मेहरबानीने झालेला हा प्रकार आहे. त्यानंतर त्यांनी कारखान्याला क्लीन चीट दिली.

रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यातील राजकीय वाद यानिमित्ताने पुन्हा उफाळून आला आहे.
रोहित पवार यांनी राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात पराभव केला होता.
बारामती लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून भाजपने राम शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली होती.

 

Web Title :- MLA Rohit Pawar | ram shinde aggressive for high level inquiry into ncp rohit pawar baramati agro sugar factory

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Ajit Pawar | राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या ‘या’ 10 मागण्या, ‘वर्षा’ निवासस्थानी बैठक

Ajit Pawar  | पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावांच्या विकासासाठी तातडीने निधी द्या, अजित पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Jayant Patil | शिंदे गटातील आमदारांना पश्चाताप होत आहे, जयंत पाटलांचा मोठा दावा