MLA Sanjay Shirsat | ‘छत्रपती संभाजीनगर मधून औरंगजेबाची कबर हटवा’, आमदार संजय शिरसाट यांची मागणी

छत्रपती संभाजीनगर : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबादचे (Aurangabad) नामांतर छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील (MP Imtiaz Jalil) यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येत आहे. त्यांच्या आंदोलनाविरोधात भाजप (BJP)-शिंदे गटाने (Shinde Group) आक्रमक भूमिका घेतली आहे. इम्तियाज जलील यांच्या आंदोलनावर आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी टीका केली आहे. जलील यांचे आंदोलन नाही तर बिर्याणी पार्टी असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच औरंगजेबाची कबर (Tomb of Aurangzeb) औरंगाबादमधून हटवा, अशी मागणी संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) पुढे म्हणाले, हा वाद नेमका कशामुळे होतो आहे, तर औरंगजेबाच्या कबरीमुळे त्यामुळे त्याची कबर इथून काढा ही आमच्या सहकाऱ्यांची मागणी रास्त आहे. मी देखील याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना पत्र लिहून ही कबर इथून काढा, अशी मागणी करणार आहे. औरंगजेब आणि या शहराचा काहीही संबंध नव्हता. औरंगजेब येथे येऊन गेला असेल, पण त्याचा मृत्यू इथे झाला नाही. त्यामुळे त्याची कबर हटवलीच पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले.

इम्तियाज जलील यांच्या आंदोलनावर टीका करताना शिरसाट म्हणाले, जलील आणि त्यांचे सहकारी या
शहराचे वातावरण बिघडवण्याचे काम करत आहेत. बिर्याणी खाऊन लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत.
हे त्यांचे कोणतं उपोषण आहे? मी या संदर्भात पोलीस आयुक्तांची भेट घेणार आहे.
आमच्या लोकांवर जो अत्याचार झाला आहे. त्यातून मुक्ती देण्याचे काम आम्ही करत आहोत आणि यात अशा
प्रकारे कोणी निझाम येऊन आमच्यावर दादागिरी करत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही,
असा इशारा संजय शिरसाट यांनी दिला.

Web Title :- MLA Sanjay Shirsat | chhatrapati sambhaji nagar mla sanjay shirsat  demand excavate aurangzeb tomb from chhatrapati sambhaji nagar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ramdas Kadam On Uddhav Thackeray | ‘…अन्यथा तुम्हाला माझ्या घरी भांडी घासायला यावं लागेल’, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

NCP Chief Sharad Pawar | कसब्यात रवींद्र धंगेकर विजयी होतील याची मला खात्री नव्हती – शरद पवार (व्हिडिओ)

Amitabh Bachchan Accident | शुटिंग दरम्यान अमिताभ बच्चन यांचा अपघात, उपचारासाठी रुग्णालयात दाखल