MLA Sanjay Shirsat | आ.संजय शिरसाट यांना ‘हार्ट अटॅक’ची लक्षणं होती, मुलीने दिली माहिती

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – औरंगाबाद (Aurangabad) पश्चिमचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांची प्रकृती खालावल्याने अधिक उपचारासाठी त्यांना एअर ॲम्बुलन्सने (Air Ambulance) मुंबईला नेण्यात आले आहे. सध्या संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांची प्रकृती स्थिर असून रक्तदाब वाढल्याची माहिती त्यांची कन्या हर्षदा शिरसाट (Harshada Shirsat) यांनी दिली आहे.

हर्षदा शिरसाट यांनी सांगितले, कालपासून रक्तदाब (Blood Pressure) वाढला होता. त्यामुळे त्यांना सिग्मा रुग्णालयात ते अंडर ऑब्जरवेशन होते. मात्र, ही हार्ट अटॅकची (Heart Attack) लक्षणे होती म्हणून आज अधिक उपचारासाठी मुंबईला नेण्यात आल्याचे हर्षदा यांनी सांगितले. मुंबईच्या लीलावती रुग्णालयात (Lilavati Hospital) डॉ. पारकर (Dr. Parkar) आणि डॉ. नितीन गोखले (Dr. Nitin Gokhale) यांच्या निगराणीखाली उपचार होणार आहेत. दरम्यान, संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) हे विमानतळावर चालत गेले, त्यामुळे इतर हार्ट अटॅकच्या चर्चा निरर्थक आहेत.

आमदार संजय शिरसाट यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना सोमवारी दुपारी उपचारासाठी युनायटेड सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
सिग्मा हॉस्पिटलच्या (Sigma Hospital) डॉक्टरांनी सांगितले, की त्यांचा रक्तदाब वाढला होता.
त्यांना छातीमध्ये दुखत होतं तसेच अस्वस्थ वाटत होतं.
तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यांना बीपी कमी करण्याची औषध देण्यात आली.
तसेच त्यांची प्रकृती स्थीर करण्यासाठी आवश्यक ते उपचार करण्यात आले.
त्यांची यापूर्वीची अँजिओप्लास्टी (Angioplasty) मुंबईत झालेली आहे.
त्यामुळे पुढील उपचारासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय घेण्यात आला.
सकाळी आठ ते सव्वा आठ दरम्यान शिरसाट यांना एअर ॲम्बुलन्सने मुंबईला पाठवण्यात आले.

Web Title :- MLA Sanjay Shirsat | he had symptoms of a heart attack sanjay shirsats daughter gave detailed information about her health

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Rain | पुणे बुडाले पावसात; पावसामुळे शहरात हाहाकार, अनेक घरात शिरले पाणी, रेल्वे स्टेशनही बुडाले

NCP Chief Sharad Pawar | भाजपच्या माघारीनंतर शरद पवार पहिल्यांदाच प्रसार माध्यमांसमोर बोलले, म्हणाले- ‘माझी भाजपकडे मागणी नव्हती, तर…’