MLA Santosh Bangar | मंत्रालयाच्या गेटवर आमदार संजय बांगर यांची पोलिसांना शिवीगाळ? ‘तू मला शिकवणार का?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे गटाचे (Shinde Group) मंत्री आणि आमदार शासकीय अधिकार्‍यांशी अर्वाच्च्य भाषेत बोलत असल्याचे प्रकरण काही दिवसांपूर्वीच उघडकीस आले होते. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावरून सत्ताधार्‍यांना सुनावले होते. परंतु, पुन्हा असाच प्रकार घडला आहे. शिंदे गटातील हिंगोलीचे वादग्रस्त आमदार संजय बांगर (MLA Santosh Bangar) यांनी मंत्रालयाच्या गेटवर पोलीस कर्मचार्‍यांना (Mumbai Police) शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. बांगर यांच्या सोबतच्या कार्यकर्त्यांना पोलीस कर्मचार्‍याने थांबवून पास काढण्यास सांगितल्याने बांगर (MLA Santosh Bangar) यांचा पारा चढला आणि त्यांनी शिवीगाळ सुरू केली. मला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. एका मराठी वृत्तवाहिनीने हे वृत्त दिले आहे.

 

दरम्यान, पोलिसांना शिवीगाळ गेल्याचा आरोप संजय बांगर यांनी फेटाळला आहे. 27 ऑक्टोबर रोजी संजय बांगर 15 कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात जात असताना गेटवर पोलीस कर्मचार्‍याने त्यांना अडवले. पोलीस कर्मचार्‍याने कार्यकर्त्यांचा पास काढण्यास सांगितल्याने बांगर संतापले. त्यांनी त्या पोलिसांशी वाद घालत मला ओळखत नाही का? अशी विचारणा केली. यानंतर पोलीस कर्मचार्‍याने वरिष्ठांकडे तक्रार केली.

 

संजय बांगर (MLA Santosh Bangar) यांनी खुलासा करताना म्हटले की, मी पोलीस कर्मचार्‍यांशी हुज्जत घातली नाही. मी काही कार्यकर्त्यांसोबत मंत्रालयात (Ministry) जात असताना तेथील पोलीस कर्मचार्‍याने डायरीत प्रवेशाची नोंद करण्यास सांगितले. यावेळी एका कार्यकर्त्याने सोबत आमदार असल्याचे सांगितले. त्या कर्मचार्‍याने मला ओळखले नव्हते. पण ओळखल्यानंतर सन्मानाने मला आत पाठवले. माझ्या पीएने नंतर डायरीत नोंद केली. आम्ही कोणतीही हुज्जत घातली नाही. हुज्जत घातली असेल तर सीसीटीव्ही कॅमेरे तपासा.

 

बांगर यांनी दावा केला की, मी कशासाठी पोलीस कर्मचार्‍याशी हुज्जत घालेन. तो बिचारा कर्मचारी सकाळपासून तिथे काम करत असतो. कर्तव्य बजावणार्‍या त्या कर्मचार्‍याशी मी हुज्जत घातली नाही. मला मुख्यमंत्र्यांनी कोणतीही समज दिलेली नसून, त्या सर्व बातम्या चुकीच्या होत्या.

दरम्यान बांगर यांच्या या शिवीगाळ प्रकरणावर पडसाद उमटू लागले असून विधानपरिषदेचे
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी म्हटले की, संजय बांगर आणि वाद हे एकत्र नांदणारे आहेत.
मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही ते ऐकत नाहीत.

 

संजय बांगर हे वादग्रस्त आमदार म्हणून ओळखले जातात. यापूर्वी सुद्धा त्यांच्याबाबतीत अशीच प्रकरणे घडली आहे.
यापूर्वी त्यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत डबे पुरवणार्‍या गोडाऊन व्यवस्थापकाला मारहाण केली होती.
तसेच एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला शिवीगाळ आमि मारहाण केली होती.

 

Web Title :- MLA Santosh Bangar| shinde faction mla Santosh bangar abuse police at mantralaya gate in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Arvind Sawant | अरविंद सावंतांनी वर्तवलं भाकित, ‘गुजरातला प्रकल्प पळवले आणि निवडणूक जाहीर झाली आता महाराष्ट्रासाठी…’

Siddharth Malhotra-Kiara Advani | सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी ‘या’ ठिकाणी करणार धुमधडाक्यात लग्न

Shahajibapu Patil | ‘त्या’ विधानावरुन शहाजीबापूंचा अजित पवारांना खोचक सवाल, म्हणाले- ’95 साली कुठल्या गावाला गेला होता?’