आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या हस्ते कुडाळ येथील कोरोना इमरजन्सी केअर सेंटरला 2 जंबो ऑक्सिजन सिलेंडर भेट

कुडाळ : पोलीसनामा ऑनलाईन  – कोरोना रोगाचे पाळेमुळे जावली तालुक्या सह ग्रामीण भागात घट्ट होऊ लागले आहेत त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना मोठ्या प्रमाणात विविध साधनांची कमतरता जाणवत असल्याची बाब लक्षात घेऊन लोकसहभागातून कुडाळ या ठिकाणी कोरोना केअर सेंटर उभारण्यात आल असून या सेंटरचे उद्घाटन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून करण्यात आले .

सध्या सातारा जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांना बेड उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले असून याचाच विचार करता कुडाळ ग्रामस्थांनी लोकसहभागातून कोरोना केअर सेंटर उभारले असून यासाठी अनेकांनी भरभरून मदत केली आहे या करोना केअर सेंटरला आमदार शिवेंद्रराजे भोसले मित्र समूह कुडाळ गट यांच्या माध्यमातून आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते दोन जम्बो ऑक्सीजन सिलेंडर देण्यात आले यावेळी छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मित्र समूहाचे सदस्य जयदीप शिंदे, अजय शिर्के ,समीर आतार, दिनेश गायकवाड रणजित शिंदे, अमोल भिलारे ,संदीप परामने, तुषार तरडे ,प्रवीण मोरे, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते