MLA Uday Samant | ‘आमच्या 40 पैकी अनेकांना अद्याप न्याय मिळाला नाही, त्यामुळे बच्चू कडूंचा…’, उदय सामंत यांची मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक प्रतिक्रिया

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात मागील काही दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्ताराची (Maharashtra Cabinet Expansion) चर्चा रंगली आहे. शिंदे-फडणवीस युती सरकारचा (Shinde-Fadnavis Alliance Government) मंत्रिमंडळ विस्तार रखडला असताना अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने सरकारमध्ये प्रवेश केला. पहिल्याच दिवशी राष्ट्रवादीच्या आमदारांना (NCP MLA) मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. त्यामुळे इच्छूक आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. याच दरम्यान आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. यावर मंत्री उदय सामंत (MLA Uday Samant) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सध्या उदय सामंत (MLA Uday Samant) विदर्भ दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तारावर सूचक विधान केलं आहे.

उदय सामंत (MLA Uday Samant) म्हणाले, आमदार बच्चू कडू यांनी आत्तापर्यंत सहकार्य केलं आहे. बच्चू कडू माझे ज्येष्ठ सहकारी आहेत. आमच्या सरकारसोबत ते युतीत आहेत. त्यांच्याबरोबर आमचे अपक्ष राजेंद्र यड्रावकर (Rajendra Yadravkar) मंत्री होते, त्यांनाही न्याय मिळालेला नाही. अन्यही अनेकांना न्याय मिळालेला नाही. आमच्या 40 पैकी काही इच्छुकांना न्याय मिळालेला नाही. बच्चू कडूंचा गैरसमज होणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे. ज्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार होईल, तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) योग्य तो निर्णय घेतली, असं सामंत यांनी सूचक विधान केलं.

सरकामध्ये शिंदे गटाला वाईट वागणूक मिळते का? या प्रश्नावर बोलताना उदय सामंत यांनी ही चर्चा फेटाळून लावली. कोणतीही वाईट वागणूक आम्हाला मिळत नाही. इथे मुख्यमंत्रीच शिवसेनेचे (Shivsena) आहेत. आमच्या सर्वांचा एकनाथ शिंदेंवर विश्वास आहे. ते योग्य निर्णय घेतील याची आम्हाला खात्री असल्याचे सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, आमदार बच्चू कडू यांनी अजित पवार यांना अर्थखातं (Finance Minister) देऊ नये अशी मागणी केली आहे.
यावर बोलताना उदय सामंत यांनी सांगितले की, अर्थखातं कुणाला देऊ नये वगैरे सांगण्याएवढे आम्ही मोठे नाहीत. शिवसेनेच्या सर्व आमदारांचा पूर्ण विश्वास एकनाथ शिंदेंवर आहे. ते जो निर्णय घेतील तो आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने व राज्याच्या हिताचा असेल याची पूर्ण खात्री आहे. त्यामुळे आम्ही कोणाला कोणतं खातं द्यावं, याची चर्चाही करत नाही, असं उदय सामंत यांनी सांगितलं.

Web Title :  MLA Uday Samant | uday samant on bachcu kadu not satisfied over cabinet expansion

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा