MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औरंगाबादमध्ये गुन्हा दाखल; राज्यात घडामोडींना वेग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण तापलं आहे. या प्रकरणात आता पोलिसांनी तात्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ (DGP Rajneesh Seth) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यानंतर आता एक मोठी बातमी समोर येत आहे. औरंगाबादमध्ये (Aurangabad) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे (FIR On MNS Chief Raj Thackeray). पोलिसांनी घालून दिलेल्या अटींचं उल्लंघन झाल्याचं समोर आल्याने पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली असल्याचे समजते.

 

औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) राज ठाकरेंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कलम 116, 117 आणि 153 अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
थोड्याच वेळात औरंगाबाद पोलिसांकडून (Aurangabad Police) याबाबत अधिक माहिती देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
औरंगाबाद पोलिसांनी सभेला परवानगी देताना ज्या अटी – शर्थी घातल्या होत्या त्यांचं उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, नुकतंच सांगलीच्या शिराळा कोर्टाकडून (Shirala Court) राज ठाकरे यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट (Non – Bailable Warrant) जारी करण्यात आलं.
त्यानंतर आता राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबादमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात (City Chowk Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी आज शेवटचा दिवस असल्याचं म्हणत मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा अल्टिमेटम दिला आहे.
तर दुसरीकडे अजामीनपात्र वॉरंट आणि औरंगाबादमधील दाखल झालेल्या गुन्ह्यावरुन राज्यात घडामोडींना वेग आला असून गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील (Dilip Walse Patil) तात्काळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहेत.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | A case registered in Aurangabad against MNS chief Raj Thackeray and organisers of a public rally where Thackeray delivered a speech on May 1st

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा