Pune Pimpri Crime News | पिंपरी : गहुंजेत कोयता गँगची दहशत, घराच्या खिडकीच्या काचा फोडल्या; दोघांना अटक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – Pune Pimpri Crime News | किरकोळ वादातून टोळक्याने गहुंजे परिसरात धुडगूस घातला. कोयत्याने (Koyta) घराच्या खिडकीच्या काचा फोडून नुकसान करत आरडा ओरडा करून परिसरात दहशत माजवली. ही घटना सोमवारी (दि.27) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गहुंजे गावात घडली असून याप्रकरणी शिरगाव पोलिसांनी 7 ते 8 जणांवर गुन्हा दाखल करुन दोघांना अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

याबाबत सागर जालिंदर बोडके (वय-26 रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी शिरगाव पोलीस ठाण्यात (Shirgaon Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन विकी शर्मा (रा. मामुर्डी, ता. मावळ), प्रज्वल मळेकर (रा. साईनगर, ता. मावळ), करण भिसे (रा. साईनगर) यांच्यासह 4 ते 5 जणांवर आयपीसी 143, 144, 147, 148, 149, 427, 452, 504, 506 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन प्रज्वल मळेकर व करण भिसे यांना अटक केली आहे. (Pune Pimpri Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर आणि विकी यांच्यात मामुर्डीतील मांडव टाहाळ्यात किरकोळ वाद झाला होता. या वादातून विकी सोमवारी फिर्यादी यांच्या घरात घुसून आई-वडिलांना कोयत्याचा धाक दाखवला. शिवीगाळ करत वडिलांची कॉलर पकडून तुम्हाला माज आला आहे. तुमचा मुलगा सागर बोडकेचा खून करतो, त्याला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्यानंतर हातातील कोयत्याने घरासमोरील खिडकीच्या काचा फोडल्या. गल्लीत आरडा-ओरडा करुन दहशत निर्माण केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

Pune Crime News | पुणे : केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 13 लाखांची फसवणूक