MNS Chief Raj Thackeray | मनसेच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू असतानाच बाळासाहेबांचा ‘तो’ व्हिडीओ राज ठाकरे यांच्याकडून Tweet

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Chief Raj Thackeray | मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी 4 मे पर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्याचा कालावधी काल संपला. मात्र यापुर्वीच पोलिस मनसे कार्यकर्ते (MNS Activists) आणि पदाधिकाऱ्यांची धरपकड सुरू करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. त्याचबरोबर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज ठाकरे यांच्या घराबाहेरील पोलीस सुरक्षाही वाढवण्यात आलीय.

 

भोंगा (Loudspeaker) आणि हनुमान चालिसा पठण (Hanuman Chalisa) यावरुन राज्यात गोंधळ माजला आहे. राज ठाकरे यांनी दिलेल्या इशा-यानंतर आता मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली आहे.

 

 

दरम्यान, अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांनी पहाटे अजानच्या वेळी हनुमान चालिसा लाऊडस्पीकरवर वाजवली आहे. तर काही ठिकाणी मनसेचे कार्यकर्ते सज्ज होते. परंतु, अजान झालीच नाही. यानंतर आता राज ठाकरे यांनी स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचा जुना व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामुळे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

Web Title :- MNS chief raj thackeray shared old video of balasaheb thackeray over loudspeaker controversy

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा