MNS Chief Raj Thackeray | ‘राजकारणात कुणाकडे बघून मनात घंटी नाही वाजत, मंदिरात दणादण घंटा वाजतात’…, राज ठाकरेंची पुण्यात फटकेबाजी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राजकारणामध्ये कुणाकडे बघून मनात घंटा नाही वाजत, मंदिरात दणादण घंटा वाजतात. एक घंटी कधी वाजत नाही, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राजकीय घडामोडींवर (Maharashtra Politics) भाष्य केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकलेला पहायला मिळाला. रविवारी पुण्यात सुरु असलेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनात राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

 

मुलाखतीमध्ये राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांना, तुमच्यात बाळासाहेबांनी असं काय पाहिलं की तुम्हाला व्यंगचित्रकार (Cartoonist) म्हणून वारसदार म्हटलं? या प्रश्नावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरे मला त्यांचा व्यंगचित्रकार म्हणून वारसदार का म्हटले हे आता मला त्यांना विचारता येणार नाही, या हजरजबाबी उत्तरावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

एखादी राजकीय कल्पना त्यांनी माझ्यामध्ये पाहिली. मला बाळासाहेब (Balasaheb Thackeray) आणि माझ्या वडिलांनी मला व्यंगचित्र शिकवलं. त्यावेळी डेव्हिड लो (Cartoonist David Low) एक ब्रिटिश कार्टूनिस्ट होता. त्यांना मी फॉलो केलं. मी 8 ते 10 तास स्केचिंग करायचो. बाळासाहेबांनी मला सांगितलं, जे दिसेल ते काढ, मला कचरा पेटी दिसतील, त्याचेही चित्र काढायला सांगितलं होतं. जी कल्पना सुचते ते ते काढलं नाहीतर तो चित्रकार कसा, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

 

मी ज.जे. स्कुल ऑफ आर्टस्चा (Sir J. J. School of Art) विद्यार्थी आहे.
व्यंगचित्र हे चित्रकलेतील शेवटची पायरी आहे. आधी नाक, कान, डोळे यांचा अभ्यास
केल्याशिवाय व्यंगचित्र काढणं सोपं नाही, असे मत राज ठाकरे यांनी व्यक्त केलं.
कर्मर्शिअल आर्टमध्ये अवयवांबाबत फार शिकवलं जात नाही, असा मुद्दा यावेळी उपस्थित केला.
यावर त्यांनी, आपण थोडेच डॉक्टर आहोत, कुठला अवयव कुठे आहे एवढं कळलं म्हणजे बास झालं,
असं मिश्कील उत्तर राज ठाकरे यांनी दिलं.

 

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | mns leader raj thackeray on political cartoon interview in shodh marathi manacha

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Rakul Preet Singh | अभिनेत्री रकुल प्रीत सिंह निळ्या ड्रेसमध्ये दिसत आहे एकदम झक्कास; फोटो व्हायरल

Pune News | सामाजिक, राजकीय गुन्हे मागे घेण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांचे कॉँग्रेस शिष्टमंडळाला आश्वासन

Smita Gondkar | अभिनेत्री स्मिता गोंदकरच्या हॉट आणि सेक्सी फोटोजने वाढवले सोशल मीडियाचे तापमान