MNS Chief Raj Thackeray | ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत, ट्रोलिंगवरुन राज ठाकरेंचा पत्रकारांना सल्ला, म्हणाले…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज (शनिवार) पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर आले आहेत. पिंपरी-चिंचवड एडिटर्स गिल्ड आयोजित पत्रकार हल्ला विरोधी कायदा परिषदेत पत्रकार हक्कासाठी लढणाऱ्या राज्यातील पत्रकारांचा गौरव (Journalists’ Glory) राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी राज्यातील पत्रकारांच्या सद्य स्थितीवर भाष्य केलं. तसेच राज्यातील राजकारणावरही (Maharashtra Politics) भाष्य केले. हा कार्यक्रम आकुर्डीतील ग.दि. माडगूळकर सभागृहात झाला.

 ट्रोल करण्यासाठी राजकीय पक्षांनी लोकं पाळलीयत

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) म्हणाले, मार्मिक ते आज पर्यंतची पत्रकारिता मी स्वत: पाहत आलो आहे. व्यंगचित्रकार (Cartoonist) आणि पत्रकार हे एकच आहेत. मी राजकारण आणि पत्रकारिता दोन्ही पाहात आलोय. त्यामुळे आज पत्रकारांवर होणारे हल्ले (Attacks on Journalists) हे नक्कीच निषेधार्ह आहे. पण ट्रोल वगैरे करणे, मुळात हे तुम्ही वाचताच कशाला. एकादा माझा कार्यक्रम, बोलणं संपलं की मी पुन्हा कमेंट्स पाहत नाही. मग तुम्ही कशाला पाहता, हे मोबाईल म्हणजे रिकाम्यांचा धंदा. घरी आलं की बोट आपटत बसायचं, राजकारण्यांनी तर यासाठी विशेष लोक पाळलेली आहेत. त्यामुळे तुम्ही याकडे लक्ष देणं बंद करावं. ज्यांना ज्ञान नाही, त्यांना कशाला गांभीर्याने घ्यायचं, अशा शब्दात ट्रोलिंगच्या मुद्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं.

महाराष्ट्राच्या हिताचे लिहिण्याची गरज आहे

राज ठाकरे पुढे म्हणाले, राज्यात पत्रकारिता अजुनही जिवंत आहे. असे असले तरी अनेकांना घरी बसून काही कामे नसते. मागचा पुढचा इतिहास माहिती नसतो. काही लोकं राजकीय पक्षांनी पाळलेली असतात. त्यांना लिहायचे पैसे मिळतात. त्यांचा त्रास करुन घेऊ नका, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले. जे महाराष्ट्राच्या हिताचे आहे, ते लिहिण्याची सध्या गरज आहे, असे आवाहन त्यांनी पत्रकारांना केले.

सत्तेचा अमरपट्टा घेऊन कुणीही जन्माला येत नाही

प्रत्येकाचा एक काळ असतो, सत्तेचा अमरपट्टा कोणीही घेऊन येत नसतो. सत्ता ज्या दिवशी हातात येते, त्याच दिवशी ती जायला लागते. ती टिकवायची किती, तेवढचं तुमच्या हातात असते. विरोधी पक्ष कधी जिकंत नसतो, सत्ताधारी पक्ष हारत असतो, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. पुर्वी पत्रकारांसाठी लढणाऱ्या भाजप (BJP) पक्षाच्या सत्तेच्या काळातच पत्रकारांवर बंधने लादली जात आहेत. ही चिंताजनक बाब असल्याचे सांगत भाजपने त्यांचा इतिहास एकदा उलघडून पाहावा, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.

प्रत्येकाचा काही काळ असतो

मला म्हणतात तुमच्या सभेल गर्दी होते. पण, मते मिळत नाही.
पण 2009 मध्ये 13 आमदार काय मटक्याच्या आकड्यावर निवडून आले होते का,
लोकसभेला उमेदवारांना लाखावर मते पडली होते. पण, प्रत्येकाचा काही काळ असतो.
सुरुवातीला भाजपचे किती खासदार होते. अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee),
बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याही मोठ्या सभा होत होत्या.
पण, मते किती पडत होती. त्यावेळी काँग्रेस शिवाय काय पर्याय होता.
त्याप्रमाणे प्रत्येकाचा काही काळ असतो, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Political News | अजित पवारांचे थेट जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यावर लक्ष, राजकीय संघर्ष आणखी वाढणार!