MNS Chief Raj Thackeray | सांगली-माहीमच्या कारवाईनंतर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले – ‘हे अतिक्रमण नाही तर…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे प्रमुख राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी गुढी पाडवा मेळाव्यात (MNS Padwa Melava) बोलताना माहीमच्या समुद्रातील मजार (Mumbai Mahim Mazar) आणि सांगलीची मशीद अनधिकृत असल्याचा दावा केला होता. तसेच दोन्ही ठिकाणी कारवाई करण्याची मागणी राज ठाकरे यांनी जाहीर सभेत केली होती. एवढेच नाही तर माहीम येथील मजार हटवली नाही, तर त्याच्या बाजूलाच मोठं गणपती मंदिर उभा केले जाईल असा इशारा राज ठाकरे यांनी प्रशासनाला दिला होता. राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांच्या इशाऱ्यानंतर 12 तासात दोन्ही ठिकाणची अनधिकृत बांधकामं हटवण्यात आली.

सांगली आणि माहीम येथे प्रशासनाने कारवाई करुन अनधिकृत बांधकामे (Unauthorized Construction) हटवल्यानंतर राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी पहिल्यांदाच यावर प्रतिक्रिया दिली आहे. माहीमच्या त्या मजारीचा फोटो राज ठाकरे यांनी फेसबुकवर शेअर केला आहे. यासोबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत. तसेच त्यांनी जनतेला जगृक राहण्याचा सल्ला दिला आहे.

https://www.facebook.com/photo/?fbid=765323271621245&set=a.535839717902936

काय म्हणाले राज ठाकरे?

धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मशिदीची दृश्य मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar), मुंबई मनपा आयुक्त श्री. इक्बाल चेहेल (BMC Commissioner Iqbal Chehail), सांगली मनपा आयुक्त श्री. सुनिल पवार (Sangli Municipal Commissioner Sunil Pawar), जिल्हाधिकारी तसंच इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो.

आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर
धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे. त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच
आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं!

Web Title :- MNS Chief Raj Thackeray | raj-thackeray-first-reaction-after-
sangli-mahim-majar-mosque-demolition

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही – मंत्री उदय सामंत

Women Maharashtra Kesari | पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान