MNS Chief Raj Thackeray | ‘तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्या ‘सजा’कारांना…’, राज ठाकरेंची शाब्दिक टोलेबाजी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त (Marathwada Mukti Sangram Din) राज्यातील आणि वशेषत: मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. राज ठाकरे यांनी शाब्दिक टेलेबाजी करत अन्याय करणाऱ्यांना चिमटे काढले आहेत. आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी म्हटले.

राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, पण हे करताना फक्त ‘फोटो-ऑप’ म्हणून कार्यक्रम साजरे करणं किंवा मराठवाड्यात येऊन आश्वासनांची खैरात वाटणं म्हणजे हा दिवस साजरा केला असं मानून चालणार नाही. पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरु आहे, आणि ह्यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस (Maharashtra Rain) झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे. अशावेळेस एकांनी आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं ह्याचा विचार करायचा नाही हे सुरु राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेने आता दोघांनाही प्रश्न विचारायची वेळ आली आहे.

https://x.com/RajThackeray/status/1703261940586586615?s=20

राज ठाकरेंची शाब्दिक टोलेबाजी

तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता
ह्याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे,
आणि त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे. मी मागच्या वेळेस म्हणलं होतं
तसं तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली
त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्रामाच्या दिनाच्या
मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा, असेही राज ठाकरे यांनी नमूद केलं आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Accident News | दिवे घाटात टेम्पो उलटून १२ कामगार जखमी