जय श्रीराम ! राज ठाकरे करणार अयोध्येचा दौरा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता श्रीरामचं दर्शन घेण्यासाठी अयोध्याला जाणार आहेत. राज ठाकरे याचा अयोध्या दौरा झाल्यास मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय समीकरणं बदलण्याची चिन्हे आहेत. अचानक राज ठाकरे यांनी दोन वर्षांपूर्वी पक्षाचा झेंडा बदलून हिंदुत्वाच्या दिशेनं वाटचाल केले. आणि आता पुढचं पाऊल त्याने टाकलं आहे. तर मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक मनसेच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची आहे. नव्या भूमिकेसह मनसे निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याच्या तयारीत आहे.

आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनं मनसेची महत्त्वाची बैठक आज मुंबईतील एमआयजी क्लबमध्ये झाली. मनसेच्या पुढील रणनीतीवर या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीतील देताना माहिती मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले राज ठाकरे हे १ ते ९ मार्च या कालावधीत अयोध्येचा दौरा करतील, असं त्यांनी सांगितलं. अशी माहिती त्यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

महाविकास आघाडी झाल्यानं राज्यातील राजकीय समीकरणं बरीच बदलली आहेत. सध्या प्रमुख विरोधी पक्ष असलेला भाजप महाविकास आघाडीशी टक्कर घेत आहे. या साऱ्यामध्ये मनसेला स्थान निर्माण करायचे आहे. तर मनसेने हिंदुत्वाची भूमिका घेतल्यामुळं मनसे भाजपशी युती करणार का, अशी एक चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यामुळं युतीच्या हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. त्यामुळंच या दौऱ्याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.