तयार राहा …! मनसेकडून ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकचा इशारा 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भारतीय वायुसेनेने पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला. त्यानंतर देशभरात राजकीय आरोप – प्रत्यारोपांनाही ऊत आला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्मण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी दिवस, ठिकाण आणि वेळ देखील निश्चित करण्यात आली आहे.

येत्या शनिवारी ते मुंबईत सभा घेणार आहेत. ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक, महाराष्ट्र सैनिकांनो तयार राहा’ असं लिहिलेले पोस्टर्स सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. नुकतंच भारतीय वायुसेनेने पाकिस्तानातील दहशतवाद्यांवर केलेल्या एअर स्ट्राईकची पार्श्वभूमी याला असली, तरी हा राजकीय सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे नेमका कोणावर आघात होणार याच्या चर्चा रंगलेल्या आहेत. येत्या शनिवारी, म्हणजेच नऊ मार्चला संध्याकाळी पाच वाजता वांद्र्यातील रंगशारदा सभागृहात या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे.
महागठबंधन होणार का ? 
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे राष्ट्रवादीसोबत महाघाडीत येण्याच्या चर्चा आहेत. राष्ट्रवादीकडून मनसेला हिरवा कंदील मिळाल्याचं म्हटलं जातं. त्यात शुक्रवारी मुंबईत झालेल्या सभेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी ‘हे महागठबंधन आहे, आमच्यासोबत येण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे खुले आहेत’ असं सांगितलं होतं. त्यामुळे काँग्रेसच्या महाआघाडीची दारं मनसेसाठी उघडण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत.

महत्वाच्या बातम्या –

पालकमंत्र्यांकडून वाहतूकीच्या नियमांची पायमल्ली 

मोदींवरील ‘त्या’ डॉक्युमेंट्रीसाठी जाळली चक्क रेल्वेची बोगी 

जेव्हा मोदीजी ‘कोची’ चे ‘कराची’ करतात… 

घातपाताचा कट उधळला, औरंगाबादमध्ये ATS कडून डॉक्टरसह 4 जण ताब्यात 

‘या’ समितीसाठी भाजप-सेना युती