MNS Leader Nilesh Mazire | पक्ष सोडण्याच्या चर्चेवर मनसे नेते निलेश माझीरेंचा मोठा खुलासा; म्हणाले – ‘लोड घेऊ नका मी…’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Nilesh Mazire | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांची 22 मे रोजी पुण्यात (Pune) सभा होणार यावर शिक्कामोर्तब झाला आहे. दरम्यान या सभेच्या आधी मनसेला एक धक्का (MNS Activist Resigns) बसण्याची शक्यता असल्याचं वृत पसरलं. पुण्यातील मनसेचे कट्टर कार्यकर्ते, माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझीरे (MNS Leader Nilesh Mazire) मनसे सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्या वृत्ताला पुर्ण विरोम मिळाला आहे.

माझीरे यांनी फेसबुक पोस्ट करत आपण मनसेतच राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. माझ्याविरोधात माध्यमांत चर्चा रंगवून कटकारस्थान रचले जातंय असा आरोप देखील निलेश माझीरे (MNS Leader Nilesh Mazire) यांनी केला आहे. माझीरे यांनी शिवसेनेचे संपर्कनेते सचिन अहिर (Sachin Ahir) यांची 2 दिवसांपूर्वी भेट घेतली होती. त्यानंतर ते शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. अखरे यावर खुद्द माझीरे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

माझीरे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात की, “काल रात्रीपासून मी शिवेसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या काही न्यूज चॅनलवर फिरू लागल्या आहेत. पण मी माझ्या फेसबुक पोस्टद्वारे सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगू इच्छितो की मी मनसे आणि वसंत तात्या मोरे (Vasant More) यांना सोडणार नाही.” असं त्यांनी सांगितलं.

”मी काही दिवसांपूर्वी स्वारगेट येथे कब्बडी स्पर्धेसाठी गेलो होतो, त्याठिकाणी शिवसेनेचे सचिन अहिर साहेब आले होते. त्यांना मी पुष्पगुच्छ देण्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पण मी कुठंही शिवसेनेत प्रवेश करणार आहे असं बोललो नाही. मी वसंत तात्या मोरे आणि मनसेला सोडणार नाही, हे माझ्याविरुद्ध कटकारस्थान रचले जातंय. असं ते म्हणाले. तसेच, “माझ्याविरोधात कारस्थान रचणाऱ्या विरोधकांनी मी एवढंच सांगतो की, तुम्ही जास्त लोड घेऊ नका मी मनसेतच आहे.” असा इशारा करत माझीरे यांनी सायंकाळी 7 वाजता लाईव्ह येणार असल्याचं सांगितलं आहे.

Web Title : MNS Leader Nilesh Mazire | vasant more nilesh mazire mns shivsena raj thackeray pune news

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

सोन्या-चांदीच्या दरात वाढ की घसरण? जाणून घ्या आजचे ताजे दर

 

Maharashtra Monsoon Updates | मुंबईत 6 जूनला मान्सूनची एन्ट्री? राज्यात ‘या’ तारखेला वरुणराजाचं आगमन होणार; IMD चा अंदाज

 

Pune Municipal Corporation (PMC) | पावसाळा पूर्व कामांना अद्याप म्हणाविशी गती नाही; आयुक्तांनी तीनही अतिरिक्त आयुक्तांकडे सोपविली जबाबदारी

 

Pune PMC Water Supply | सूस, म्हाळुंगे आणि बावधन बुद्रूक मधील पाणी पुरवठा प्रकल्पाचा आराखडा आठवड्याभरात तयार होणार

लवकरच निविदा प्रक्रिया राबवून कामाला सुरूवात केली जाईल – विक्रम कुमार, महापालिका आयुक्त