MNS Leader Sandeep Deshpande | मनसे नेते संदीप देशपांडेंच्या चालकाला अटक; देशपांडे, धुरी अजुनही…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Sandeep Deshpande | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी औरंगाबादमधील (Aurangabad) सभा घेतल्यावर समर्थकांना 4 तारखेनंतर अजान सुरू झाली की हनुमान चालिसा वाजवा (Hanuman Chalisa), असे आदेश दिले होते. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस मनसे नेत्यांना ताब्यात घेत आहेत. मात्र दादर येथे राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानासमोर पोलिसांना गुंगारा देत मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी (Santosh Dhuri) यांनी पलायन केलं होतं. अशातच पोलिसांनी त्यांची कार चालवणाऱ्या चालकाला अटक केली आहे.

 

संदीप देशपांडे पळून जात असताना एक महिला पोलीस जखमी (Lady Policeman Injured) झाली होती.
मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) यावरून संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा (Crime of Homicide) दाखल केला आहे.
संदीप देशपांडे फरार झाले असले तरी त्यांनी यावर एक व्हिडीओ शेअर करत आपलं स्पष्टीकरण दिलं होतं.

 

आम्ही काहीही केलं नसून आम्हाला पोलिसांवर विश्वास आहे. पोलिसांना आम्ही सहकार्य केलं आहे, आम्हीही कायद्याचा आदर करतो.
मात्र खोट्या केस करत असाल तर त्या कधीच सहन करणार नसल्याचं संदीप देशपांडे यांनी म्हटलं होतं.
त्यासोबतच महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याच्या आरोपावरही त्यांनी आपली बाजू मांडली आहे.

 

दरम्यान, आम्ही तिथून गेल्यावर टीव्हीवर बातम्या पाहिल्या, मात्र ज्या महिला पोलीस अधिकारी धक्का लागून जखमी झाल्या त्यांना माझा धक्का लागलेलाच नाही.
फुटेजमध्येही तसं दिसत आहे, माझ्याभोवती 7 ते 8 पोलीस पुरूष होते. एका पुरूषाला पकडण्यासाठी महिला अधिकारी जात नसल्याचं देशपांडेंनी सांगितलं.

 

Web Title :- MNS Leader Sandeep Deshpande | mns leader sandeep deshpande driver has been arrested by a team of mumbai shivaji park police station

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा