MNS Leader Shalini Thackeray | ‘महिलांचे अस्तित्वच सरकारला अमान्य’ – मनसे नेत्या शालिनी ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS Leader Shalini Thackeray | राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet Expansion) लांबल्याने मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde-Fadnavis Government) दोनच दिवसांपूर्वी खोचक टीका केली होती. आता मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यावर, त्यामध्ये एकही महिलेचा समावेश नसल्याने मनसे नेत्या शालिनी ठाकरे (MNS Leader Shalini Thackeray) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

 

मंत्रिमंडळ विस्तारात महिलांवर झालेल्या अन्यायाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे (MNS Leader Shalini Thackeray) यांनी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये ठाकरे यांनी म्हटले आहे की, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या 288 आमदारांपैकी 24 महिला आमदार आहेत. त्यातल्या 12 महिला आमदार भाजपच्या (BJP) आहेत, तरीही भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्य मंत्रिमंडळात एकाही महिलेला मंत्रीपद द्यावेसे वाटले नाही ! खरंच, आपले सत्ताधारी, आपली संपूर्ण राजकीय व्यवस्था इतकी महिलाविरोधी #AntiWomen का आहे ?

 

शालिनी ठाकरे (MNS Leader Shalini Thackeray) यांनी पुढे म्हटले आहे की, महाराष्ट्रात बंडखोर गट आणि भाजप यांच्या युतीचे सरकार स्थापन होऊन 39 दिवस उलटल्यानंतर अखेर काल मंत्रिमंडळ विस्तार झाला.
18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यात एकही महिला मंत्री नाही.
यावर अनेकांनी टीका केली की, राज्य सरकार (Maharashtra State Government) महिलांना ’दुय्यम’ वागणूक देत आहे.
पण ही दुय्यम वागणूक नव्हे ! राज्यातल्या 5 कोटी मुली, महिला यांचे अस्तित्वच हे सरकार अमान्य करत आहे.
For MahaGovt, women doesn’t exist, असे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

 

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करण्यास विलंब होत असल्याने दोनच दिवसांपूर्वी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली होती.
त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की, बंड झाले, आता थंड झाले ? तुमचं सर्व ओके आहे हो, पण लोकांच्या समस्येकडे कोण बघेल ?

 

Web Title : –  MNS Leader Shalini Thackeray | existence of women is unacceptable to the government mns leader shalini thackerays angry reaction

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा