MNS on CM Uddhav Thackeray | मनसेचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा; म्हणाले – ‘कौतुक कार्यसम्राटांचं होतं, Facebook वरील टोमणेसम्राटांचं नाही’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – MNS on CM Uddhav Thackeray | मशिदींवरील भोंग्यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी राज्य सरकारला (Maharashtra State Government) 3 मे पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी धडक कारवाई करत उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) मशिदींवरील बेकायदा लाउडस्पीकर उतरवण्यास सुरूवात केली आहे. या निर्णयाचे स्वागत राज ठाकरे यांनीही केले. या पार्श्वभूमीवर आता मनसेनं (MNS) थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘कार्य सम्राटाचे कौतुक केले जाते. फेसबकवरुन टोमणे मारणाऱ्या टोमणेसम्राटांचे नाही.’ असं मनसेनं म्हटलं आहे. (MNS on CM Uddhav Thackeray)

 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आगामी जाहीर सभेवरून मनसे नेते संदीप देशपांडे (MNS Leader Sandeep Deshpande) यांनी निशाणा साधला. संदीप देशपांडे म्हणाले, ”बघू मुख्यमंत्री काय बोलतायत ते. त्यांचे फेसबुक लाइव्ह ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो आहोत. आता मुख्यमंत्री कोरोना सोडून काहीतरी बोलतायत याचा आनंद आहे. योगी आदित्यनाथ यांनी काम केले, भोंग्याचा विषय मार्गी लावला. कौतुक कार्यसम्राटांचे होते, फेसबुकवर टोमणे मारणाऱ्या टोमणेसम्राटांचे होत नाही,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. (MNS on CM Uddhav Thackeray)

पुढे बोलताना संदीप देशपांडे म्हणाले, ”धार्मिक तेढ कुणाकडून निर्माण होते ? राज ठाकरे म्हणतात की, जो न्यायालयाचा आदेश आहे, त्याचे पालन सरकारने करायला हवे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करायला पाहिजे म्हणणारे लोक धार्मिक तेढ कसे निर्माण करतात, हे सरकारने स्पष्ट करायला हवे. जे लोक म्हणत आहेत की, न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणार नाही, डेसिबलचे पालन करणार नाही, त्या लोकांना सांगायला हवे की धार्मिक तेढ निर्माण करू नका. आम्ही नियमांचे पालन करत आहोत. जे पालन करणार नाही, त्यांना शिकवण्याची गरज आहे. त्यांना पोलिसांनी नोटीस देण्याची गरज आहे.”

 

”मनसेच्या स्थापनेला 16 वर्ष झाली. यामध्ये राज ठाकरेंनी अनेक सभा घेतल्या आहेत.
कोणत्याही सरकारने आम्हाला सरळ मार्गाने सभा घेऊ दिली नाही. त्यामुळे सभेची परवानगी कशी घ्यायची, हे आम्हाला माहिती आहे.
आम्ही अनुभवातून शिकलो आहोत,” असं देखील संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

 

Web Title :- MNS on CM Uddhav Thackeray | mns leader sandeep deshpande taunt uddhav thackeray after yogi adityanath took action on illegal mosque loudspeaker

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा