‘मरकज’च्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे : राज ठाकरे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कोरोनामुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आल्यामुळे बहुतांश नागरिक घरी बसले आहेत. अशाही परिस्थितीत रुग्णालयात मरकजच्या सदस्यांकडून डॉक्टरांना दिल्या जाणार्‍या असभ्य वागणुकीवर बोलताना राज ठाकरे यांनी मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारले पाहिजे असे म्हटले आहे. मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचले पाहिजे. निवडणुकीच्य काळाता कुणाला मतदान करावे सांगायला येणारे मुल्ला मौलवी आहेत कुठे ? अशी विचारणाही त्यांनी केली. निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिल्लीमधील निझामुद्दीन येथील तबिलगी मरकजच्या कार्यक्रमावर बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे.

मरकजच्या लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे. यांच्यासाठी वेगळा विभाग उभा करावा आणि त्यांची वैद्यकीय उपचार बंद करायला हवे. लोकांच्या अंगावर थुकतायत का, या लोकांना फोडून काढतानाचे व्हिडीओ व्हायरल हवेत. धर्म वैगेरे गोष्टी बोलायची ही वेळ नाही. पण मुसलमानांमधील काही अवलादी आहेत त्यांना आत्ताच ठेचलं पाहिजे. लॉकडाउन आत्ता आहे, नंतर आम्ही आहोतच, असा इशारा ठाकरेंनी दिला.

लॉकडाउनची शिस्त पाळा, अन्यथा अर्थसंकट निर्माण होईल
हा जो लॉकडाउन आहे गांभीर्याने घ्यावा. लोकांना रेशन, भाजीचे असे अनेक प्रश्न पडले आहेत. अनेक ठिकाणी सरकार उपलब्ध करुन देत आहे. पण मला भीती एका गोष्टीची आहे ती म्हणजे जर लॉक़डाउन वाढवला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. सरकारकडे कोणताही कर येणार नाही. उद्योगधंद्यावर परिणाम होतील. आधीच 50 टक्क्यांवर पगार आणले आहेत. जितके दिवस वाढवू तसा परिणाम होत जाणार. शिस्त पाळली जाणार नाही तर अर्थसंकट निर्माण होईल. मोदी यावर काहीतरी बोलतील अशी अपेक्षा होती. लॉकडाउन पाळत आहेत त्यांच्या मनात भीती आहे. नोकरी राहणार का ? उद्या भाजीपाला मिळणार का ? असे प्रश्न त्यांना सतावत आहेत. जे शिस्त पाळत नाही आहेत त्यांच्यामुळे हे घडत आहे. व्हॉट्सअप, चॅनेलवर ज्या बातम्या येत आहेत ते पाहूनच धक्का बसतो. आजकाल प्रत्येक घरी एक डॉक्टर झाला आहे. कोणी म्हणते गोमूत्र प्या, लसूण खा, कांदा खा.डॉक्टर काय उगाच मेहनत करत नाही आहेत. जीव धोक्यात घालून ते काम करत आहेत.

You might also like