भाजप-मनसे युती ? राज ठाकरे लवकरच मोठी घोषणा करण्याच्या तयारीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम –  मुंबईत वांद्रे येथे एमआयजी क्लबमध्ये आज मनसेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आहे. त्यात मनसेचे सर्व महत्वाचे नेते उपस्थित आहेत. आणि राज ठाकरेही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याण्याची शक्यता आहे. तर दुसरं म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असल्याचे समजते आहे. तर येणाऱ्या १ ते ९ मार्च दरम्यान राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचं नियोजन पक्षाकडून केलं जात असल्याची माहिती समोर येत आहे.

या बैठकीत राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील उपस्थित आहेत. तर येत्या महापालिका निवडणुकांसंदर्भात राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या बैठकीत राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा निश्चित केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसं झालं तर राज ठाकरे यांचा हा पहिला मोठा दौरा ठरणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मनसेने पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्वाच्या मार्गावर पक्ष लक्ष केंद्रीत करत असल्याचं बोललं जात होतं. त्यानंतर भाजप आणि शिवसेनेमध्ये जवळीक निर्माण झाल्यानंतर राजकारणात भाजप आणि मनसेची युती होण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर युतीच्या या गणितांबाबत भाजप नेत्यांना विचारण्यात आलं असता त्यांनी वेळोवेळी थेट नकार दिला नव्हता. त्यावेळी मनसेची उत्तर भारतीयांविरोधाची भूमिका मवाळ झाली तर पुढचा विचार होऊ शकेल, असंही भाजपकडून सांगण्यात आलं होत. आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यानंही मनसे आणि भाजपच्या या युतीची नांदी तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.