MNS | मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा; म्हणाले – ‘लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू’

पुणे न्यूज : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) –  काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाराष्ट्रात अलीकडच्या काळात जातीसंदर्भातील संघर्ष वाढीला लागल्याचे वक्तव्य केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) उदयानंतर हा संघर्ष वाढू लागला, असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला होता. याच पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष (State President of Sambhaji Brigade) प्रविण गायकवाड (Pravin Gaikwad) यांनी पोस्ट करत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

पुण्यात फिरणं मुश्किल करु

प्रविण गायकवाड यांनी राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पुण्यातील मनसेने (Pune MNS) आक्रमक पवित्रा घेतला आहे.
मनसेचे पुणे शहर अध्यक्ष नगरसेवक वसंत मोरे (Corporator Vasant More) म्हणाले, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पुण्यातून इच्छूक असणारा तू… मी स्वतः पाहिलाय तुला गल्लो गल्ली
फिरत सांगत होतास की मी प्रवीण गायकवाड ,मी प्रवीण गायकवाड… तुला राज ठाकरे काय कळणार…
लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणे मुश्किल करू… असा इशारा वसंत मोरे यांनी दिला आहे.

प्रश्न अनेक उत्तर फक्त राज ठाकरे

तर मनसे महिला शहराध्यक्षा रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी म्हटले की, राज ठाकरे नेहमी जातीपातीच्या पलीकडच्या राजकारणातील घटना सांगतात. रोखठोक बोलतात.
योग्य ते योग्य, चूक ते चूक स्पष्ट भूमिका मांडतात. 21 व्या शतकात महाराष्ट्राचे व्हिजन, भविष्य संदर्भात बोलतात. एकच जात माणुसकी, महाराष्ट्र धर्म, तरीही काही असंतुष्ट लोकांना, बिनकामी लोकांना बोलायचे असेल तर त्यांनी चौकटीत बोलायचं.
आपण जर आपली पात्रता सोडून बोलला तर महाराष्ट्र सैनिक, राजदूत पात्रता सोडून जशास तसं छान उत्तर देतील.
राज ठाकरे नुसते बोलत नाहीत तर सत्य, वस्तूस्थिती आणि रोखठोक बोलतात.
प्रचंड काम करतात. उगाच लोक कृष्णकुंजवर येऊन त्यांच्या अडचणी मांडत नाही.
कारण प्रश्न अनेक असतील तर उत्तर राज ठाकरे आहेत, अशा शब्दात त्यांनी सुनावलं.

 

काय म्हणाले प्रविण गायकवाड ?

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वत:ला राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
त्यांना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.
अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून केली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे ?

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे (Shivshahir Babasaheb Purandare) यांच्या 99 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला पुण्यात राज ठाकरे यांनी हजेरी लावली होती.
तेव्हा राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्रात आधीपासूनच जात ही गोष्ट होती.
मात्र स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. मात्र, मागील 20 वर्षापासून लोक स्वत:च्या जातीच्या अभिमानासोबतच इतरांचा तिरस्कार करण्यापर्यंत पोहोचले आहे आणि राजकीय स्वार्थाहून हे सगळं केलं गेलं आहे. जातीचा हा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या आयडेंटीटीचा भाग झाला आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

 

Web Title : mns vasant more rupali patil thombare warns pravin gaikwad over criticism raj thackeray

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Gold Silver Price Today | सोन्याच्या किंमतीत वाढ, तर चांदीच्या किंमतीत घसरण; जाणून घ्या आजचे दर

Mumbai Crime | वंशाच्या दिव्यासाठी न्यायाधीशाच्या मुलीचा परदेशात नेऊन केला 8 वेळा गर्भपात, सासरच्या मंडळींवर FIR दाखल

Haiti Earthquake | ‘हैती’त भूकंपाचं तीव्र पडसाद, अनेक इमारती जमीनदोस्त तर आतापर्यंत 1297 जणांचा मृत्यू