नव्या इमारतीच्या उद्घाटना दिवशी छत गळाल्याच्या निषेधार्थ मनसेचे रेनकोट आंदोलन

पुणे पोलीसनामा ऑनलाइन

पुणे महानगरपालिकेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन काल उपराष्ट्रपती वैकय्या नायडू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मात्र उद्घाटन होऊन काही मिनिटं होत नाही.तोवर सभागृहातील छत गळतीची घटना घडली.या घटनेच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेत मनसेचे गटनेते वसंत मोरे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्री घेऊन आणि रेनकोट घालून महापालिका आयुक्तांच्या दालना बाहेर आंदोलन केले.नगरसेवक साईनाथ बाबर, रुपाली पाटील, पदाधिकारी  आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

यावेळी वसंत  मोरे म्हणाले की,महापालिकेच्या नव्या इमारतीचे काम बाकी राहिले आहे.याची कल्पना सत्ताधारी भाजपला अनेक वेळा दिली असताना देखील यांनी घाईमध्ये इमारतीचे उद्घाटन केले आहे.त्यांच्या या घाईमुळे पहिल्याच पावसाचे पाणी छतामधून उद्घाटनावेळी सभागृहात आले आहे.यातून कामाचा दर्जा समोर आला असून सर्व सामान्य नागरिकांच्या कर रूपातून आलेला पैसा देखील यांनी पाण्यात घातला आहे. या कामाला जबाबदार असणाऱ्या आधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे.अशी मागणी मनसेने केली.

महत्वाच्या बातम्या-
सभागृहातून पारदर्शी व जबाबदारीपूर्ण कामकाज व्हावे : उपराष्‍ट्रपती व्‍यंकय्या नायडू
उद्घाटना दिवशीच पुणे महापालिकेच्या नव्या इमारतीला गळती