BSNL च्या ग्राहकांना झटका, ‘या’ प्लॅन्सच्या किंमतीत 30 रूपयांपर्यंतची वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बीएसएनएल ( भारत संचार निगम लिमिटेड ) या सरकारी दूरसंचार कंपनीने आपल्या १७ ब्रॉडब्रँड प्लॅन्स पैकी ७ प्लॅन्सच्या दरात २० ते ३० रुपयांची दरवाढ केली आहे. १ ऑगस्ट पासून ब्रॉडब्रँड प्लॅन्सचे मंथली चार्ज बदलण्यात येणार असून, किंमतीच्या वाढी संदर्भातील सूचना BSNL ने वापरकर्त्यांना पाठवल्या आहेत. तर केरळ BSNL ने याबाबत अधिकृत सूचना जारी केल्या आहेत.

कोणत्या प्लानची किती किंमत
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी २GB BSNL CUL प्लानचे मंथली शुक्ल ३४९ रुपये होते. ते आता वाढवून २६९ रुपये करण्यात आले आहे. ग्राहकांना या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा ८Mbps च्या स्पीडने मिळतो. २ जीबी नंतर स्पीड कमी होऊन १Mbps होतो. या प्लानमध्ये BSNL ते BSNL अनलिमिटेड कॉलिंग व इतर नेटवर्कवर कॉलिंग करण्यासाठी ६०० रुपयांची कॉलिंग मिळते. तसेच यामध्ये सकाळी ६ वाजेपासून रविवारी अनलिमिटेड कॉलिंग मिळते.

इतर नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग देणाऱ्या २GB CUL प्लानच्या किंमतीत देखील कंपनीने वाढ केली आहे. पूर्वी या प्लानची किंमत ३९९ रुपये होती. आता वाढून ती ४१९ रुपये करण्यात आली आहे. अनलिमिटेड कॉलिंग शिवाय सर्व सुविधा २GB BSNL CUL या प्लानमधील आहेत. त्याप्रमाणे BSNL ने ३GB CUL प्लानच्या किंमत ४९९ रुपयांवरुन ५१९ रुपये केली आहे. ४GB CUL प्लानची किंमत ५९९ रुपयांवरुन ६२९ रुपये, ५GB CUL प्लानची किंमत ६९९ रुपयांवरुन ७२९ रुपये करण्यात आली आहे.

या दोन प्लानच्या किंमतीत बदल
BSNL ने Superstar ३०० या ७४९ रुपयांच्या प्लानची किंमत वाढवून ७७९ रुपये केली आहे. यामध्ये ग्राहकांना ३०० जीबी डेटा पर्यंत १०Mbps ची स्पीड मिळते. लिमिट संपल्यानंतर स्पीड कमी होऊन २Mbps होते. प्लानमध्ये इतर नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच BSNL ने १५GB CUL प्लानची किंमत ९९९ रुपयांऐवजी १०२९ रुपये एवढी केली आहे.