Live मॅच दरम्यान ‘त्या’ दोघींनी चक्क काढलं ‘T-शर्ट’, व्हिडिओ व्हायरल झाल्यानं सर्वत्र खळबळ

वॉशिंग्टन : वृत्तसंस्था – एका लाईव्ह मॅचदरम्यान दोन तरुणींनी आपले टी शर्ट काढले. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढले. सुरक्षारक्षकांना जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी तात्काळ दोघींना ताब्यात घेत स्टेडीयमच्या बाहेर काढले. जुलिया रोज आणि लॉरेन समर असे स्टेडीयममध्ये टी शर्ट काढणाऱ्या दोन तरुणींची नावे आहेत. या दोघी मॉडेल्स असल्याचे समजतेय.

अमेरिकेत दोन संघादरम्यान बेसबॉलचा सामना सुरु होता. तेव्हा या दोन तरुणींनी अचानक आपले टी शर्ट काढले. तेव्हा उपस्थित जमावांनी त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यास सुरुवात केली. जेव्हा खेळाडूंना ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी आपले डोळे बंद केले. सुरक्षा रक्षकांना हा प्रकार समजताच त्यांनी त्या दोघींकडे धाव घेत त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्यांना स्टेडीयमच्या बाहेर काढले. दरम्यान, उपस्थितांनी काढलेले फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले.

लॉरेन आणि जुलिया या दोघी मॉडेल असल्याचे सांगण्यात येत असून या सामन्यासाठी हजर राहण्यासाठी दोघींनी 60 हजार पाऊंड म्हणजेच 55 लाख रुपये खर्च केले होते. या मैदानात दोघींवर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. आपण दुसऱ्या मैदानात जाऊन एका सामन्यादरम्यान असाच पराक्रम गाजवणार असल्याचे दोघींनी म्हटले आहे.

दरम्यान, एका मुलाखतीमध्ये जुलियाने म्हटले आहे की, ब्रेस्ट कॅन्सरच्या अवेअरनेससाठी आम्ही असे केले. अमेरिकेमध्ये बेसबॉलचे सामने पाहण्यासाठी हजारो लोक येत असतात. त्यामुळे या संधीचा फायदा घेतला. तिने सांगितले की मी फुटबॉल प्रेमी आहे. फुटबॉलच्या सामन्यात आपल्यावर कॅमेरा येणार नाही कारण त्यावेळी अनेक लोक सामना पाहण्यासाठी येतात. मात्र, बेसबॉल सामन्यादरम्यान आपल्यावर कॅमेरा येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे मी बेसबॉल मॅचची निवड केली.

Visit : Policenama.com 

शिंक कधीच दाबून ठेऊ नका, शरीरावर होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम
अभिनेत्री मलाइका अरोडा म्हणते, ‘खास डाएटपेक्षा नेहमी पौष्टिक आहार घ्यावा’
प्रेशर कुकर वापरताना ‘हे’ १० नियम आवश्य पाळा…आणि सुरक्षित रहा
मानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा
उर्जा आणि उत्साह दिवसभर टिकवण्यासाठी ‘हे’ आवश्य करा, जाणून घ्या
संक्रमणापासून बचावासाठी करा; या विटॅमिनचा वापर, जाणून घ्या –
चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
वजन कमी करण्याचा ‘हा’ आहे खास ‘जपानी फार्मुला’! जाणून घ्या