Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी मंत्रिमंडळाचा आज (बुधवार) सायंकाळी विस्तार (Modi Cabinet Expansion) झाला. 43 नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे (Narayan Rane), कपिल पाटील (Kapil Patil), डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) आणि डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) यांचा समावेश आहे. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी प्रामुख्याने चार दिग्गजांचे आभार मानले. ते म्हणाले की, आज मी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मी आभारी आहे. पीएम मोदी देतील, ती जबाबदारी मी संभाळेन असं ते म्हणाले.

सन 1985 मध्ये सुरूवातीला मुंबई महापालिकेत नगरसेवक झालो, त्यानंतर बेस्टमध्ये चेअरमन अन् नंतर आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पुन्हा आमदार, खासदार आणि आज आता केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतोय. याचं सर्व श्रेय पीएम नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचं नारायण राणेंनी सांगितलं.

हे देखील वाचा

Mumbai-Kolhapur Special Train | मुंबई-कोल्हापूर विशेष सेवा सुधारित क्रमांक व संरचनेसह धावणार

Police Suicide News | तरूण पोलिसाची गळफास घेऊन आत्महत्या, प्रचंड खळबळ

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Modi Cabinet Expansion | After being sworn in as Union Minister Narayan Rane thank you to PM Narendra Modi, Home Minister Amit Shah, J.P. Thanks to Nadda and Devendra Fadnavis

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update