Modi Cabinet Expansion | नारायण राणे, ज्योतिरादित्य शिंदेंसह संभाव्य मंत्री पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी दाखल

नवी दिल्ली – वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार (Modi Cabinet Expansion) होत आहे. मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातून नारायण राणे (narayan rane)  यांची वर्णी लागणार असल्याचं सांगितलं जातंय तर मध्य प्रदेशातून ज्योतिरादित्य शिंदे (jyotiraditya scindia) यांचा समावेश होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, हे तिघेही पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) निवासस्थानी दाखल झाल्याचं वृत्त आहे.

आज सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान केंदीय मंत्रिमंडळाचा विस्तार (Modi Cabinet Expansion) होणार आहे. त्यापुर्वी पीएम मोदी संभाव्य मंत्र्यांची भेट घेत आहेत.
सुमारे 17 ते 22 नवे मंत्री आज शपथ ग्रहण करतील अशी चर्चा आहे.
त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद मंत्रिपद आणि गोपनियतेची शपथ देतील.
गेल्या काही दिवसांपासुन केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराची (Modi Cabinet Expansion) जोरदार चर्चा सुरू होती.

महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना गावित यांची वर्णी लागणार अशी चर्चा होती.
मात्र, सध्यातरी नारायण राणे हे पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत.
भाजपकडून अगोदरच नेत्यांना फोनवरून मंत्रिपदाची सूचना देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली बाहेर असलेल्या नेत्यांना तात्काळ दिल्लीला बोलावून घेण्यात आलं आहे.
आज सायंकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
आता मात्र, महाराष्ट्रातून नारायण राणे यांची मंत्रिपदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चितच झालं आहे अशी देखील चर्चा आहे.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

 

Web Title : Modi Cabinet Expansion | Narayan Rane,
Pritam Munde, Shinde and other potential ministers arrived
at the residence of Prime Minister Modi

 

दिग्गज अभिनेता दिलीपकुमार यांचं निधन, मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास

 

Movies Live Blog | दिलीपकुमार यांनी महात्मा गांधींच्या अनुयायांसोबत घालवली होती येरवडा कारागृहात रात्र; पुण्याशी होते त्यांचे ऋणानुबंद

Pune Police News | लग्नाच्या आमिषाने 27 वर्षीय तरुणीवर बलात्कार; पोलीस कर्मचाऱ्याला लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक