खुशखबर ! मोदी सरकारचा मोठा निर्णय, ग्राहक संरक्षण कायद्यास मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेत सुरु असलेली कॅबिनेट बैठक संपन्न झाली आहे. यात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यातील एक महत्वाचा निर्णय म्हणजे ग्राहक संरक्षण बिल 2019 ला मंजुरी दिली आहे. हे बिल पुढील आठवड्यात संसदेत पास होऊ शकते. ग्राहकांच्या हितांची रक्षा करणाऱ्या नवीन तरतूदी आंतरराष्ट्रीय मानांकनावर अधारित आहे. याच कॅबिनेट बैठक मोटर व्हेयिकल अमेंडमेंट बिलाला मंजूरी देण्यात आली आहे. याशिवाय साखरेचा 20 लाखाचा बफर स्टॉक बनवण्याच्या कॅबिनेटने सूचना दिल्या आहेत.

ग्राहक संरक्षण बिल 2019 ला मंजूरी –
आज ग्राहक संरक्षण बिल 2019 ला मंजूरी देण्यात आली आहे. या विधेयकात ग्राहकांच्या हिताच्या रक्षणासाठी नव्या तरतूदी आंतरराष्ट्रीय मानांकनावर आधारित आहे. याशिवाय मोटर व्हेयिकल अमेंडमेंट बिलाला मंजूरी देण्यात आली आहे.

तर साखरेचा बफर स्टॉक बनवण्यासाठी कॅबिनेटने सूचना जारी केली आहे. पुढील आठवड्यात याला मंजूरी देण्यात येईल. शनिवारी यासंबंधीची बैठक पंतप्रधान कार्यालयात होणार आहे.

सध्या असलेला साखरेचा स्टॉक 30 लाख टन असून त्याची सीमा 30 जून पर्यत आहे. सरकार सध्याचे स्टॉकचा कालावधी 1 वर्षासाठी वाढवू शकते. त्यासाठी सरकार 1100 कोटी रुपयांची सब्सिडी देखील देऊ शकते.

मोठ्या एअरपोर्टवर टॅरिफ चार्ज लावण्याचा सरकारचा विचार –
तर सरकार मोठ्या एअरपोर्टवर टॅरिफ चार्ज लावण्याचा विचार करत आहे. त्याबाबचा निर्णय घेण्यासाठी वेगवेगळ्या अथॉरिटी बनवण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. वर्षाला 15 लाखापेक्षा अधिक प्रवासी असणाऱ्या एअरपोर्टला हा नियम लागू होणार आहे.
आरोग्य विषयक वृत्त-
रक्ताची गाठही ठरू शकते मृत्यूचे कारण ; वेळीच व्हा सावध
पावसाळ्यात त्वचेची घ्या अशी ‘काळजी’
सतत तणावग्रस्त राहिल्यास चेहऱ्याची चमक फिकी पडते
धक्कादायक ! मनुष्यांच्या कवटीतून बाहेर येत आहेत शींग