खुशखबर ! मोदी सरकार 3 लाखापेक्षा जास्त ‘सदनिका’ बांधणार, ‘घर’ हवंय मग असा करा अर्ज, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्ही नवे घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही मोठी बातमी आहे. केंद्र सरकार पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत 3 लाखापेक्षा जास्त सदनिका निर्माण करण्यास मंजूरी दिली आहे. वृत्तानुसार पंतप्रधान आवास योजना (शहरी) अंतर्गत केंद्रीय मंजूरी आणि नियंत्रणात समितीच्या बैठकीत 3,31,075 सदनिका निर्माण करण्यास मंजूरी देण्यात आली. यात 15,125 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. मोदी सरकारच्या या निर्णयाचा फायदा लाखो लोकांना होण्याची शक्यता आहे.

कोणत्या राज्यात तयार करणार किती घरे –
सरकारने या योजनेला मंजूरी दिल्यानंतर आंध्र प्रदेशात 2,58,648 सदनिका तयार करण्यात येणार आहेत. तर कर्नाटकात 30,777, मध्यप्रदेशात 15,245 सदनिका तयार करण्यात येतील. याशिवाय महाराष्ट्रात 4,691, गुजरातमध्ये 13,805, उत्तराखंडात 1,541 सदनिका तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली आहे. सरकारने पंतप्रधान आवास योजनेची सुरुवात 2015 साली झाली होती. या योजनेचा उद्देश आहे की आर्थिक रुपाने कमकूवत असलेल्या लोकांच्या घराचे स्वप्न पूर्ण करणे. ही योजना शहरी आणि ग्रामीण भागात वाटली गेली आहे.

असा करा अर्ज –
पंतप्रधान आवास योजनेचा लाभ त्या लोकांना मिळत नाही ज्यांच्याकडे पहिल्यापासून स्वत:चे घर आहे. याअंतर्गत विविध वयोगटाच्या लोकांना गृह कर्जवर अंशदान (सब्सिडी) मिळेल. योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही माध्यामांचा वापर करु शकतात. ऑनलाइन लाभ घेण्यासाठी https://pmaymis.gov.in/ या वेबसाइटवर जावे लागेल. शिवाय कॉमन सर्विस सेंटरच्या माध्यमातून ऑफलाइन अर्ज देखील करता येईल.

Visit : Policenama.com