४ लाख नोकर्‍यांसाठी भर्ती सुरू, मोदी सरकारचा दावा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान आहे, वाढत्या बेरोजगारीचे. देशातील तरुणांना रोजगार मिळत नसल्याने मोदी सरकारवर टीका करण्यात येत आहे. तर मोदी सरकारमधील एका नेत्यांने दावा केला आहे की, केंद्र सरकारने ४ लाख जणांना नोकरी देण्यासाठी भरती प्रक्रिया सुरु केल्याचे सांगितले आहे.

राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत प्रश्नकाळादरम्यान सांगितले की, रिक्त जागा भरुन त्याचा टक्का मागील सहा वर्षात जवळपास १६ टक्कांनी कमी करुन ११ टक्के केला आहे.

सिंह यांनी रिक्त पदांच्या आकड्यांबद्दल सांगताना २०१३ – २०१४ मध्ये रिक्त पदाचा टक्का १६.२ होता. यानंतर यात कमतरता येऊन ती २०१४ – १५ मघ्ये ११.५७ टक्के झाली. जेव्हा २०१५ -१६ मध्ये ही संख्या ११.५२ झाली होती. तर २०१६ – १७ मध्ये ११.३६ टक्के होता.

या परिक्षा सध्या घेण्यात येत आहे असे देखील राज्यमंत्र्यांनी सांगितले. या अंतर्गत केंद्रच्या निवड आयोगाकडून ही निवड होणार आहे. यात विविध विभागातून ही परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यांनी सांगितले की २०१७ – १८ मध्ये एकूण रिक्त पदांची संख्या ६,८३,८२३ होती. यात आधिक पदे रेल्वे बोर्ड, स्टाफ सिलेक्शन कमिशन आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यात येणार आहे. यात जवळपास ४ लाख पदे भरण्याची प्रक्रिया सुरु आहे.

आरोग्यविषयक वृत्त –