धक्कादायक ! २ वर्षात भारतात ‘व्हिसा’ मिळवून आले ८७००० पाकिस्तानी, २३ लाख बांग्लादेशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मागील वर्षात तब्बल ८७ हजार पाकिस्तानी २३ लाख बांग्लादेशी व्हिसा घेऊन भारतात आले आहेत, मोदी सरकारने मागील २  वर्षात तब्बल ८७ हजार ६६९ पाकिस्तानींना भारतात येण्याचा विविध श्रेणींचा व्हिसा दिला आहे. तर तब्बल २३  लाख बांग्लादेशींचा व्हिसा भारत सरकारने स्वीकारला आहे. सरकारने लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना २०१६  आणि २०१७ ची ही आकडेवारी सांगितली आहे.

एवढ्या पाकिस्तानी, बांग्लादेशी नागरिकांना मिळाला व्हिसा –
सरकारी आकड्यांनुसार २०१६  मध्ये सरकारने५२,५२५ पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा देण्यात आला आहे. तर या वर्षी ३५ हजार १४४ पाकिस्तानी नागरिकांना मोदी सरकारकडून विसा देण्यात आला. मात्र उरी हल्लानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना विसा देण्याबाबत नियंत्रण आणले आहे त्यामुळे या वर्षाचे आकडे कमी झाले. तर २०१६ मध्ये ९ लाख ३३ हजार ६९५ बांग्लादेशी नागरिकांना विसा देण्यात आला. तर २०१७ मध्ये ही संख्या आणखी वाढली. या वर्षी तब्बल१३  लाख ७० हजार ४२० बांग्लादेशांना व्हिसा मिळाला.

खासदार विष्णू द्याल राम यांनी या आकडेवारीबद्दल प्रश्न विचारला होता. तसेच त्यांनी दुसरा प्रश्न असा ही विचारला की शेजारील देशातून भारतात परत येणाऱ्या नागरिक विसाचा अवधि संपल्यानंतर अवैध पद्धतीने राहत नाहीत ना हे शोधण्यासाठी काही व्यवस्था आहे का?

यावर केंद्रिय मंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, केंद्र सरकार स्थलांतर, व्हिसा आणि विदेशी नागरिकांची नोंदणी आणि ट्रेकिंग या संबंधित मिशन मोज ही योजना राबवते. या मिशनमध्ये या सर्व वीजा घेऊन आलेल्या नागरिकांना ट्रेक करण्याची सुविधा आहे. गृह राज्य मंत्र्यांनी सांगितले की योग्य वेळेनंतर भारतात राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा पत्ता लावण्यासाठी तपास यंत्रणा लक्ष देऊ आहे.

आरोग्य विषयक वृत्त

या’ घरगुती उपायांनी काळ्या ओठांना बनवा मऊ आणि गुलाबी

जाणून घ्या – मूत्रपिंड विकाराची लक्षणे

‘या’ कारणांमुळे हाताच्या बोटांना येते सूज

गर्भनिरोधक गोळ्यांचा होऊ शकतो ‘सेक्स लाईफ’वर परिणाम

Loading...
You might also like