खुशखबर ! मोदी सरकारचं शेतकर्‍यांना ‘मोठं’ गिफ्ट, ‘या’ डाळींसह १४ खरीप पिकांच्या ‘किमान अधारभूत’ किंमतीत वाढ

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने निवडणूक यश मिळाल्यावर शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या योजना आणण्यावर भर दिला आहे, तसेच शेतकरी बांधवाचे उत्पन्न कसे दुप्पट करता येईल यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. याचाच एक भाग म्हणून मोदी सरकारने शेतकऱ्यांना खूश करणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने खरीप हंगामातील १४ पिकांवर किमान अधारभूत किंमतीत वाढ केली आहे.

केंद्र सरकारने आज कॅबिनेट बैठकीत या संबंधीचा निर्णय घेत शेतकऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. सरकारने किमान अधारभूत किंमतीत वाढ केली आहे. ही वाढ तूर, सोयाबीन, उडीद डाळ, सुर्यफूलाच्या बिया याच्या किंमतीत केली आहे. या निर्णायाचा शेतकऱ्यांना फायदा होईल अशी आशा बाळगली जात आहे.

‘या’ डाळींमागे एवढी वाढ
सोयाबीन, तुरडाळ यासारख्या उत्पादनात प्रति क्विंटलमागे जवळपास १०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यात सर्वात जास्त वाढ ही सोयाबीन मध्ये करण्यात आली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

* सोयाबीन – सोयाबीनच्या किंमतीत ३११ रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
* सुर्यफूलाच्या बिया – सुर्य फूलांच्या बियांच्या किंमतीत २६२ रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
* तूर डाळ – तूर डाळीत १२५ रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.
* उडीद डाळी – उडीद डाळीच्या किंमतीत १०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.
* तीळ – तीळाच्या किंमतीत २३६ रुपये प्रति क्विंटलन वाढ करण्यात आली आहे.
* ज्वारी – ज्वारीच्या किंमतीत १२० रुपये प्रति क्विंटलने वाढ करण्यात आली आहे.
* मूग – मूगाच्या किंमतीत ७५ रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.
* शेंगदाणा – शेंगदाण्याच्या किंमती २०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.
* कापूस – कापसावर प्रतिनुसार २०० आणि १०० रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे.

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?