Coronavirus : सरकारनं ‘कोरोना’ व्हायरस ‘ट्रॅकर’ अ‍ॅप ‘आरोग्य सेतु’ केलं लॉन्च, ‘असं’ करणार काम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. भारतातही या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. या व्हायरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारेदेखील शक्य ती पावले उचलत आहेत. या पार्श्वभूमीवर आता सरकारने कोविड -१९ चा मागोवा घेण्यासाठी ‘आरोग्य सेतु’ लाँच केला आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्त्यांना मदत करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे. ज्याद्वारे ते कोरोना संक्रमित रूग्णांच्या संपर्कात आले आहेत की नाही हे त्यांना समजू शकते. वापरकर्त्यांच्या स्मार्टफोनचा लोकेशन डेटा आणि ब्लूटूथचा वापर करुन या संक्रमणाचा तपास केला जाईल.

दरम्यान, भारतात संक्रमितांचा आकडा वाढत चालला आहे. सध्या १७६४ जणांचा या विषाणूची लागण झाली असून मृतांचा आकडा ५० च्या वर गेला आहे. त्यात दिलासादायक बाब म्हणजे १५१ जण बरे झाले आहेत.