खुशखबर ! मोदी सरकार गरिबांना उपलब्ध करून देणार ‘मेट्रोपॉलिटन’ शहरात ‘हक्‍का’चे घर

नवी दिल्ली, वृत्तसंस्था – सगळ्यांना घरे देणार असे आश्वासन देणाऱ्या मोदी सरकार आपल्या दुसऱ्या कार्यकाळात गरीबांना आणि मजदूरी करणाऱ्यांना एक मोठे गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. मोदी सरकार एक प्रस्ताव आणत आहेत ज्यात देशातील मेट्रो शहरातील गरीबांना आणि रोजंदारी करणाऱ्यांना पक्के घर भाड्याने मिळू शकते. यात सर्व पायाभूत सुविधा देण्यात येतील. आवास आणि शहरी प्रकरणात मंत्रालयाने एक प्रस्ताव तयार केला आहे, या प्रस्तावात 3 लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब, मजदूरांना महानगरांत एक घर भाड्याने देण्याची ही योजना तयार करण्यात आली आहे.

मंत्रालय या योजनेला पंतप्रधान आवास योजनेला जोडणार आहे. या योजनेत झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना मुख्य धारेत जोडले जाऊ शकते. जिथे साफ पाण्याबरोबरच, शौचालय अशा पायाभूत सुविधा देण्यात येतील.या योजनेत, एक रुम (सिंगल रुम) असलेली एक उंच इमारत बांधण्यात येईल, ज्यात झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांसाठी भाड्याने घरे देण्यात येतील.या योजनेत त्या लोकांना सहभागी करुन घेण्यात येईल जे बाहेर गावाहून पोटापाण्यासाठी शहरात आले आहेत. यांना आता शहरात भाड्याने घर मिळू शकेल.

स्थलांतरीत मजुरांना मिळणार लाभ –
या प्रोजेक्टला सुरु करण्यासाठी पहिल्यांदा मजदूर फंडाचा वापर केला जाऊ शकतो, त्यासाठी हाऊसिंग बोर्ड बनवण्यात येईल. ज्याचे संचलन आवास आणि शहरी मंत्रालय करेल. याचेेच दुसरे मॉडेल हे आहे की, खासगी कंपन्याला घरे बनवण्याची अनुमती देण्यात येईल. त्यांना काही हिश्यात कमर्शियन बनवण्याची मंजूरी देण्यात येईल.

वाऊचर स्कीम द्वारा चालवली जाईल योजना –
सरकारची ही योजना वाऊचर स्कीम द्वारा चालवली जाईल. ज्यात शहरी व स्थानिक सर्वात आधी 3 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्याचे रजिस्ट्रेशन करेल. त्यानंतर त्यांना वाऊचर वाचण्यात येतील. भाडेकरू या वाऊचर्सला हाऊसिंग बोर्डला देतील.

आरोग्यविषयक वृत्त

पावसाळ्यात ‘हा’ आहार आरोग्यासाठी उत्तम

प्रत्येक कुटुंबाकडे ‘मेडिक्लेम पॉलिसी’ असणे फायद्याचे

महिलांसाठी “योगाचे” महत्व जास्त

जुळी मुलं होण्यासाठी अनेक दांपत्य उत्सुक

#YogaDay2019 : दीर्घायुष्य प्राप्त करू शकता, धरा योगाची वाट

#YogaDay2019 : ‘सेक्स पॉवर’ जागृत करण्‍यासाठी करा योगासने

सिने जगत

…म्हणून श्रीदेवी साऊथ सुपरस्टार रजनीकांतच्या तोंडावर थुंकल्या होत्या

अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांना मोठा ‘झटका’, कारण…

Loading...
You might also like