‘हा’ फायदा घेण्यासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती केले : अशोक गहलोत

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – गुजरातच्या निवडणुका येत होत्या. गुजरातमध्ये आपले सरकार बनत नाही, त्यामुळे जातीय समीकरण जुळवण्यासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवले आहे. असे वादग्रस्त वक्तव्य राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केले आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरु आहे. याचदरम्यान राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. गुजरातच्या निवडणुका येत होत्या. गुजरातमध्ये आपले सरकार बनत नाही, त्यामुळे भाजपा घाबरले होते. त्यामुळे त्यावेळी जातीय समीकरण जुळवण्यासाठी भाजपाने रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपती बनवले. त्यामुळे भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांना राष्ट्रपती पदावर विराजमान होता आले नाही. असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी म्हंटले.

विशेष म्हणजे, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना काँग्रेसअध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जाते. आणि आता लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. याचदरम्यान गहलोत यांचे हे वक्तव्य राजकीय वर्तुळात वादाचे ठरणार असल्याची शक्यता वर्तवला जात आहे.

वादग्रस्त वक्तव्यांवर निवडणूक आयोग कारवाई करत आहे मात्र वादग्रस्त वक्तव्य होणे थांबत नाहीयेत. त्यामुळे निवडून आयोग आणखी काय पॉल उचलेले याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.