जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात : आनंद शर्मा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात. मतांसाठी स्वत:ची जात काढणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. अशी टीका कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार आनंद शर्मा यांनी केली आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु आहे. देशात आज लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान सुरु आहे. याचदरम्यान, अकलूज येथील जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मी मागास जातीचा असल्याने विरोधक मला विरोध करत आहेत’ असे वक्तव्य केले होते. दरम्यान, कांग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खासदार आनंद शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले. मोदी आता हताश झाले आहेत. म्हणून जातीचा आधार घेत आहेत. यापुर्वी देशात डॉ. मनमोहन सिंग, अटलबिहारी वाजपेयी, लाल बहाद्दुर शास्त्री असे अनेक पंतप्रधान होऊन गेले. पण त्यांनी राजकारण करताना कधीही जात आणली नाही. पण असे करणारे मोदी पहिले पंतप्रधान आहेत. आधी त्यांनी मते मागण्यासाठी लष्कराचा आधार घेतला. आता जातीचा आधार घेत आहेत. ते पंतप्रधानांसारखा कधीच विचार कर नाहीत. असे त्यांनी म्हंटले.

इतकेच नव्हे तर, आम्हाला मोदींनी देशभक्ती शिकवू नये. इंग्रजांविरोधात स्वातंत्रपुत्र काळात काँग्रेस लढत असताना यांनी त्यांना मदत केली. पंतप्रधान अज्ञानी आहेत. त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या सर्वांना ते देशद्रोही ठरवतात. खऱ्या मुद्यांपासून ते पळत आहेत.असेही त्यांनी म्हंटले. याचबरोबर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडावा. पण ते गप्प आहेत. मतदारांचा विवेक आणि संयमाला ते चुकीचे समजत आहेत. याआधी कोणत्याही पंतप्रधानांनी मतदारांच्या भावनांचा अपमान केला नाही. देशात पहिल्यांदाच असे झाले आहे. असेही त्यांनी म्हंटले.

तसेच काँग्रेसने कधीही त्यांच्या जातीवर भाष्य केलेले नाही. देशाने अनेक पंतप्रधान पाहिले आहेत. पण मतांसाठी स्वत:ची जात काढणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. जे शहीदांच्या नावाने मते मागु शकतात ते मतांसाठी काही करू शकतात. असेही त्यांनी म्हंटले.

यावेळी, काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी ,आमदार शरद रणपिसे, अनंत गाडगीळ, रमेश बागवे, उल्हास पवार, अंकुश काकडे आदी उपस्थित होते.