शेतकऱ्यांना साडेतीन रुपये देऊन मोदींनी संसदेत घेतल्या टाळ्या

पाटणा : बिहार वृत्तसंस्था – केंद्राने मांडलेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी करण्यात आलेल्या घोषणावर राहुल गांधी यांनी तोंड सुख घेतले आहे. बिहारची राजधानी पाटणा येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. एका शेतकऱ्याला  साडेतीन रुपये देऊन मोदींनी संसदेत टाळ्या वाजवून घेतल्या आहेत असे राहुल गांधी यांनी म्हणले आहे.

बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेसने २८ वर्षांनी जाहीर सभा घेतली आहे. त्या ऐतिहासिक जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी राहुल गांधी पाटण्याला आले होते. सभेच्या उत्कृष्ट आयोजना साठी राहुल गांधी यांनी अभिनंदन केले आहे. त्याच प्रमाणे राहुल गांधी यांनी आगामी काळात काँग्रेसचे सरकार बिहारमध्ये नक्की येईल असे म्हणले आहे. त्यांच्या या वाक्याबरोबर उपस्थित कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद राहुल गांधी यांना दिला आहे.

मोदींनी आपल्या श्रीमंत मित्रांना काळापैसा सफेद करून दिला आहे. शेतकऱ्यांना दिवसाला १७ रुपये देऊन नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांचा अपमान दिला असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्याच प्रमाणे त्यांनी नितीश कुमार यांच्या वर  टीका करत नितीश कुमार मोदीसारखे मोठं मोठे वायदे करत आहेत असे म्हणले आहे.