मोदी शरद पवारांकडून शिकले तर राहुल गांधी मोदींकडून

दिल्ली : वृत्तसंस्था –पाच राज्यांच्या निवडणुकीच्या लगबगीमध्ये जेव्हा काँग्रेस परत उभारी घेतेय अशावेळी राहुल गांधी नेमकं काय वक्तव्य करत आहेत ज्या पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येऊ शकते सरकार स्थापन होऊ शकते तरी राहुल गांधी म्हणतात.

भारत भाजपामुक्त करायचा नाही. आम्ही लोकसभा निवडणुका अत्यंत ताकदीने लढणार आहोत. आम्ही भाजपाशी टक्कर देणार आहोत मात्र आम्हाला देश भाजपामुक्त करायचा नाही असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. देशासमोर आत्ता सगळ्यात मोठे तीन मुद्दे आहेत शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि इतर समस्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तीन महत्त्वाचे मुद्दे आहेत. या मुद्द्यांवर आम्ही पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका लढवल्या आणि याच मुद्द्यांवर आम्ही लोकसभा निवडणुकांनाही सामोरे जाणार आहोत.

भाजपाने जरी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा केली असली तरीही आम्ही मात्र त्या विचारांचे नाही आम्हाला भाजपमुक्त भारत नको असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पाच राज्यांच्या निवडणूक निकालानंतर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

याच पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हटले की मी काल आईशी (सोनिया गांधी) बोलत होतो. मी आईला म्हटले की २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमधून मी खूप काही शिकलो. तुम्हाला हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल पण हे खरे आहे. लोकांशी समरस कसे व्हायचे त्यांच्या मनात काय आहे हे कसे ओळखायचे हे मी नरेंद्र मोदींकडून शिकलो. त्या निवडणुकांमध्ये आमचा पराभव झाला. मोदींना देशाच्या जनतेने, उद्योजकांनी, शेतकऱ्यांनी युवा वर्गाने निवडले आणि त्यांना एक मोठी संधी दिली. पंतप्रधानपदी विराजमान झाल्यावर मोदी आपले प्रश्न सोडवतील असे या सगळ्याच घटकांना वाटले होते कारण आपल्या भाषणांमधून आश्वासने देऊन त्यांनी या सगळ्या घटकांना आपलेसे केले.

सत्तेवर आल्यानंतर या सगळ्या घटकांसाठी काम करण्याची मोठी संधीही मोदींकडे होती पण ती त्यांनी गमावली. आपण सत्तेवर आलो आहोत आता आपण करू तेच खरे या अहंकाराने त्यांना ग्रासले. त्याच अहंकाराचा पराभव आज झाला आहे. सत्तेवर आल्यानंतर जनतेला काय वाटते आहे हे जाणून घेण्यात मोदी अपयशी ठरले. जनतेच्या हृदयाचे ठोके त्यांच्यापर्यंत पोहचलेच नाहीत असाही आरोप राहुल गांधी पत्रकार परिषदेत केला.

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धडा गिरवला पाहिजे आणि काय चुकले त्याबाबत आत्मपरीक्षण केले पाहिजे असे मला वाटत असल्याचेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे. आज देशातले सगळे प्रश्न जैसे थे आहेत. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार हे तिन्ही प्रश्न सोडवण्यात मोदी सरकार सपशेल अपयशी ठरले आहे. तसेच नोटाबंदी, जीएसटी या संदर्भातले निर्णय जनतेला पटलेले नाहीत. जनतेचा रोषच मतपेटीतून व्यक्त झाला आहे असेही राहुल गांधी यांन्ही म्हटले आहे. तसेच आम्हाला भाजपामुक्त भारत करायचा नाही या वक्तव्याचाही त्यांनी पुनरूच्चार केला.