इम्रान खानवर कैफची टीका, म्हणाला – ‘एकेकाळचे सर्वोत्तम क्रिकेटपटू दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले बनले’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इम्रान खान हे एक दिग्गज क्रिकेटपटू होते, मात्र आता ते पाकिस्तानी लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातील बाहुले बनले आहेत, अशा शब्दात भारताचा माजी फलंदाज मोहम्मद कैफ याने इम्रान खान यांच्यवर टीका केली आहे.

इम्रान खान यांचे एक भाषण कैफने ट्विट केले आहे. या भाषणात इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत भाषण करताना दहशतवादाशी धर्माचा संबंध नसतो असे विधान केले. तसेच सध्याचे भारतीय सरकार हे संघाच्या अधिपत्याखाली असून द्वेष आणि एकाधिकारशाहीवर स्थापित आहे असेही ते म्हणाले. यावरून कैफ म्हणाला आहे की, ‘तुमचा देशाला पाकिस्तानला दहशतवादाशी बरेच काही घेणे-देणे आहे. पाकिस्तान हा दहशवाद्यांसाठी एक सुरक्षित ठिकाण आहे. संयुक्त राष्ट्रांमधील आपले भाषण अत्यंत दुर्दैवी होते. एक महान क्रिकेटपटू लष्कर आणि दहशतवाद्यांच्या हातातले बाहुले बनले आहे.’

संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीच्या 74 व्या सत्रात इम्रान खान यांचे भाषण झाले. या भाषणावर जगभरातून टीका झाली. इम्रान खान यांच्या या भाषणावर मोहम्मद शमी, हरभजन सिंह आणि इरफान पठाण यांनीही टीकास्त्र सोडलेले आहे.

Visit : Policenama.com