मोहम्मद कैफने पाक पंतप्रधानांना सुनावले खडे बोल 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रानखान खान यांना मोहम्मद कैफने खडे बोल सुनावले आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तानातील अल्पसंख्यांकांना सुरक्षित वाटेल असा पाकिस्तान घडवणार असल्याचा दावा लाहोर येथील एका आयोजित कार्यक्रमात केला होता. त्यावेळी त्यांनी भारताच्या पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. मोदी सरकारला अल्पसंख्यांकांशी कसे वागावे याबाबद शिकवावे लागेल असे ते म्हणाले होते .भारतात अल्पसंख्यांकांना समान नागरिकत्वाची वागणुक मिळत नाही. अभिनेते नसीरुद्दीन शहा यांच्या देशातील झुंडशाही पाहून भीती वाटते, या विधानावर इम्रान खान यांनी हे वक्तव्य केले होते.

https://twitter.com/MohammadKaif/status/1077459244612546561

त्यांच्या या वक्तव्याचा कैफने ट्विटरच्या माध्यमातून चांगलाच समाचार घेतला आहे .अल्पसंख्याकांच्या बाबतीत इम्रान यांनी जास्त लेक्चर झाडू नये, असं कैफने सुनावलं आहे.त्याचबरोबर त्याने असे ट्विट केले की,”फाळणीत 20 टक्के अल्पसंख्यांक पाकिस्तानात गेले होते आणि आता त्यांची संख्या 2 टक्क्यांपेक्षा कमी राहिली आहे. दुसरीकडे भारतातील अल्पसंख्यांकांची लोकसंख्या वाढली आहे.”त्यामुळे मला वाटतं अल्पसंख्याकांना कशी वागणूक देतात यावर लेक्चर देणारा पाकिस्तान हा शेवटचा देश असेल,असा टोला कैफने इम्रान यांना लगावला आहे.

प्रसिद्ध अभिनेते नसिरुद्दीन शहा यांनी भारतीय समाज मनात विष पेरलं जात असल्याचं म्हणत मला माझ्या पुढील पिढ्यांच्या सुरक्षेची काळजी वाटतेय, असं म्हटलं होतं. त्यावर इम्रान यांनी भारतात अल्पसंख्याकांना समानतेची वागणूक दिली जात नसल्याची टीका केली होती. त्यांच्या टिकेवर नसिरुद्दीन शहा यांनी देखील इम्रान यांना चोख प्रत्युत्तर दिले होते