धक्कादायक ! ‘या’ कारणामुळं आईनं पोटच्या 3 मुलांना संपवलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका 27 वर्षीय महिलाने आपल्या तीन लहान मुलांची हत्या केली. तिची मुलं महिलांच्या विरोधात हिंसा करणारे बनू नये या भीतीने या महिलेने 3 निरागस मुलांची हत्या केली. अमेरिकेच्या ओहियोमध्ये राहणाऱ्या ब्रिटनी रेनी पिल्किन्गटन यांनी या गुन्ह्यासाठी 37 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली.

मंगळवारी ब्रिटनीने आपला गुन्हा कबुल केला आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षा सुनावण्यात आली. ब्रिटनीचा 3 महिन्यांचा मुलगा नोह ऑगस्ट 2015 मध्ये मृत मिळाला होता. जर 4 वर्षांच्या गैविनचा मृत्यू एप्रिल 2015 मध्ये झाला होता. तर आणखी एक मुलाचा मृत्यू 2014 साली जुलै महिन्यात झाला होता.

ब्रिटनीने पोलिसांना सांगितले की ती डिप्रेशनमध्ये होती आणि तिला वाटत होते की त्यांची मुलं महिलाच्या विरोधात हिंसा करणारे व्यक्ती होतील. ब्रिटनी स्वत: 17 वर्षाच्या वयात लैंगिक हिंसेची बळी ठरली होती.

17 वर्षाची असताना ब्रिटनीचे तिच्या आईच्या प्रियकराने जोसेफ पिल्किन्गटन याने लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर 20 वर्षाने मोठ्या असलेल्या जोसेफशी ब्रिटनीला विवाह देखील करावा लागला होता. जोसेफने न्यायालयात कबुल देखील केली की विवाहाआधी त्याने अल्पवयीन ब्रिटनीशी शारीरिक संबंध ठेवले होते.

तर ब्रिटनीच्या वकीलांनी सांगितले की ती बऱ्याच काळासाठी लैंगिक हिंसेची शिकार होत होती आणि एका तपासात तिच्या मेंदूत दुखापत झाल्याचे देखील समोर आले. वकिलांनी हे देखील सांगितले की तिला तिच्या मुलांना गमावल्याचे दु:ख आहे आणि ती त्याच्या रोज शोकात असते.

Visit :  Policenama.com