अ‍ॅपलच्या ‘या’ ४ लोकप्रिय आयफोनची भारतातील विक्री होणार बंद !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्मार्ट फोन निर्माण करणारी ग्राहकांमधील सर्वात लोकप्रिय कंपनी अ‍ॅपल भारतात आपल्या ४ आयफोन विक्रीवर बंदी आणणार आहे. हे एंट्री लेवल स्मार्टफोन कंपनीचे सर्वात स्वस्त फोन होते. कंपनीच्या या निर्णयानंतर iPhone SE, iPhone ६, iPhone ६ Plus आणि iPhone ६s Plus या स्मार्ट फोनची विक्री बंद होणार आहे.

यामुळे आता भारतात ग्राहकांना हे एंट्री लेवल आयफोन खरेदी करणे महागात पडणार आहे. आता या स्मार्ट फोनच्या किंमती वाढल्या असून या स्मार्टफोनची किंमत आता ८००० रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अ‍ॅपल लवकरच भारतात आयफोन ऑपरेटिंग सिस्टीम असलेला ios १३ पहिल्यांदाच २२ भारतीय भाषा, मॅप, वर्चुअल असिस्टेंट siri सह सादर करणार आहे.

आयफोनचा नवा एंट्री आयफोन ६s होणार भारतीय बाजारात सादर
मागील महिन्यात अ‍ॅपलने अनेक फोनची विक्री बंद करण्यास सुरुवात केली आहे. आता अ‍ॅपल आपल्या धोरणानुसार सेलच्या संख्येपेक्षा आधिक लक्ष किंमतीवर देणार आहे. कंपनीने सांगितले आहे की जुन्या मॉडेलचा स्टॉक संपल्यानंतर भारतात अ‍ॅपलाचा नवी एंट्री लेवल फोन आयफोन ६s सादर होणार आहे. सध्या आयफोन ६ एस २९,५०० रुपयांच्या किंमतीला मिळतो. तर आयफोन SE ची एंट्री लेवल किंमत २१ ते २२ हजार असू शकतो.

कंपनीच्या नफ्यात झाली वाढ
अ‍ॅपलने हा निर्णय २०१८-१९ मध्ये भारतात महसूल आणि नफ्यात झालेल्या सुधारानंतर घेतला आहे. अ‍ॅपलच्या विक्रीत एप्रिल आणि जूनमध्ये विक्रीत वाढ झाली. २०१८ या वर्षांत कंपनीला महसूलात १२ टक्के वाढ झाली म्हणजे १३,०९७ कोटी रुपये वाढ झाली. तसेच नेट प्रॉफिट वाढून ८९६ कोटी रुपये झाला.

आरोग्यविषयक वृत्त
लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे
समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’
तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या
उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय
पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल
पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या